चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनची तयारी, कोविडनंतर आता 'या' आजाराने माजवला हाहाकार China Flu Lockdown

Chinese city proposes lockdowns for flu
Chinese city proposes lockdowns for flu esakal
Updated on

China Flu Lockdown: चीन काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे चीनमध्ये कोविडचे रूग्ण कमी होत असताना, दुसरीकडे फ्लूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. या कारणास्तव, चिनी अधिकारी काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करू विचारात आहेू. या निर्णयावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोक म्हणतात की असे केल्याने कोविडच्या काळातील परिस्थिती निर्मान होईल.

Chinese city proposes lockdowns for flu
पालखी महामार्गाची पाहाणी केल्यानंतर गडकरी करणार मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मोठी मागणी Nitin Gadkari

चीनच्या शिआन शहरात लॉकडाऊनबाबत आपत्कालीन योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील संक्रमित क्षेत्रे बंद केली जाऊ शकतात. वाहतूकीमध्ये कपात करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. तसेच शॉपिंग मॉल्स, थिएटर, लायब्ररी, पर्यटन स्थळे आणि इतर गर्दीची ठिकाणेही बंद केली जाऊ शकतात.

दरम्यान कोविड महामारीवेळी, चीनने जगातील सर्वात कडक कोविड निर्बंध लागू केले होते. ज्यामध्ये काही शहरांमध्ये अनेक महिने लॉकडाऊनचा समावेश करण्यात आला होता. शिआन शहरात डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान कडक लॉकडाऊन होतं. यावेळी अनेकांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता. तसेच वैद्यकीय सेवेवरही परिणाम झाला.

Chinese city proposes lockdowns for flu
Pune crime: धक्कादायक! मुलीने दुसऱ्या लग्नाला दिला नकार, नराधम बापने...

भारतात देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन करण्यात आले आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()