सावधान! LAC वर चीनची आक्रमक चाल, भारतही हॉवित्झर, फायटर जेट्ससह सज्ज

मागच्या काही महिन्यांपासून चीनला लागून असलेल्या सीमेवर शांतता होती. आता पुन्हा एकदा चीनने सीमेवर हालचाली सुरु केल्या आहेत.
india, china, ladakh, america
india, china, ladakh, america
Updated on

लडाख: पूर्व लडाख सीमेवर (Ladakh stand off) मागच्या १७ महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये (india-china) सीमावाद सुरु आहे. मागच्यावर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्याशिवाय अनेकदा धक्काबुक्की, हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मागच्या काही महिन्यांपासून चीनला लागून असलेल्या सीमेवर शांतता होती. आता पुन्हा एकदा चीनने सीमेवर हालचाली सुरु केल्या आहेत. सीमेवरील आपली स्थिती बळकट करण्यासाठी चीन आपल्या सैनिकांसाठी छावण्या (chinese soldiers shelter) उभारत आहे. सीमेच्या जवळ असलेले एअर फोर्सचे बेस (Air force base) युद्धस्थितीसाठी सुसज्ज करत आहे.

ताज्या टेहळणी आणि गुप्तचरांच्या अहवालानुसार, पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ आठ ठिकाणी चीनने सैनिकांच्या राहण्यासाठी खास लष्करी छावण्या उभारल्या आहेत. मागच्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये सीमावादाला सुरुवात झाली. तेव्हापासून चीनने अशा अनेक छावण्या आणि तटबंदी सीमेवर उभी केली आहे. आता त्यात नव्याने आठ ठिकाणी उभारण्यात आलेल्या छावण्यांची भर पडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

india, china, ladakh, america
World Tourism Day: बॅग पॅक करा अन् चला भटकंतीला

नजीक भविष्यात चीन सहजासहजी माघार घेणार नसल्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुरापतखोरी हा चीनचा जुना स्वभाव आहे. प्रत्यक्ष युद्धाऐवजी मानसिक लढाईत चीनची जुनी रणनीती आहे. भारत आणि चीनचे प्रत्येकी ५० हजार सैनिक या भागात तैनात आहेत. हॉवित्झर तोफा, रणगाडे आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र दोन्ही देशांनी सुसज्ज ठेवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.