Chinese Bridge : ‘पॅंगाँग लेक’वर चीनचा पूल ; उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट; ड्रॅगनला वेगाने हालचाली शक्य

चीनने पॅंगाँग सरोवरावरील चारशे मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले असून आता त्यावरून वाहने देखील ये-जा करू शकतात. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने जानेवारी २०२२ मध्ये या पुलाचे हाय रिझॉल्यूशन असलेले छायाचित्र प्रसिद्ध केले होते.
Chinese Bridge
Chinese Bridgesakal
Updated on

नवी दिल्ली : चीनने पॅंगाँग सरोवरावरील चारशे मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले असून आता त्यावरून वाहने देखील ये-जा करू शकतात. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने जानेवारी २०२२ मध्ये या पुलाचे हाय रिझॉल्यूशन असलेले छायाचित्र प्रसिद्ध केले होते. आता याच वृत्तवाहिनीने टिपलेल्या आणि २२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रात या पुलाचे काम पूर्ण झाल्याचे दिसते.

या पुलावरून एक लहान वाहन धावत असल्याचे दिसत आहे. लडाखमध्ये भारत- चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेला लागून असलेल्या भागामध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. हा भूभाग १९५८ पासून चीनच्या ताब्यात आहे. या पुलामुळे पॅंगाँग लेक परिसरामध्ये चीनला उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगाने लष्करी हालचाली करता येतील. या नव्या पुलामुळे उत्तर आणि दक्षिण या दोन टोकांमधील अंतर ५० ते १०० किलोमीटरने कमी होणार आहे. या नव्या पुलामुळे चीनला वेगाने लष्करी हालचाली करता येतील असे ‘दि इंटेल लॅब’चे उपग्रह छायाचित्र विभागाचे तज्ज्ञ डॅमियन सिमन यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात मागील साठ वर्षांपासून चीनने बेकायदा हा भूभाग बळकावला असून त्याच भागात हा पूल उभारण्यात आल्याचे म्हटले आहे. आम्ही हा बेकायदा ताबा कधीही मान्य करू शकत नाही असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पॅंगाँग सरोवराच्या उत्तरेला असलेल्या रस्त्यांच्या जाळ्याशी चीनच्या ताब्यातील भाग या पुलामुळे जोडला जाणार आहे. प्राचीन तिबेटी खुर्नाक किल्ल्याशी यामुळे चीनला थेट संपर्क प्रस्थापित करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.