नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आज ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव (sharad yadav) यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना लालूप्रसाद (Lalu Prasad) यांनी नेहमीप्रमाणे नर्मविनोदी शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ( Chirag and tejswi should come together)
नितीश यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना त्यांनी नातेसंबंध तयार होतात आणि बिघडतात देखील असे सांगितले. चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र यायला हवे असेही लालूप्रसाद म्हणाले.
‘‘शरद यादव हे संसदेत नसल्याने सभागृहात निरव शांतता पसरली असून मुलायमसिंह, शरदजी आणि मी अनेक मुद्द्यांवर संघर्ष केला आहे. सध्या आपण जनता पक्षातील घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पेगॅससप्रकरणी सत्य माहिती समोर यायला हवी.’’ असे मतही त्यांनी मांडले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.