रामविलास पासवान यांच्या निधनानंतर एलजेपीमध्ये फूट पडलीय.
लोकसभा खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांना देण्यात आलेला बंगला रिकामा करण्यात आलाय. यापूर्वी त्यांना गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी पथक इथं पाठवण्यात आलं होतं. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इस्टेट संचालनालयाचं पथक तिथं पोहोचल्यानंतर, ल्युटियन्स दिल्लीमधील (Lutyens Delhi) जनपथ बंगल्यातील फर्निचर आणि घरगुती वस्तू हलविण्याची प्रक्रिया सुरू झालीय.
लोक जनशक्ती पक्षाचा (Lok Janshakti Party, LJP) अधिकृत पत्ता असलेल्या 12 जनपथ बंगल्यातून मालवाहतूक करणारे दोन ट्रक बाहेर आले, तर आणखी तीन ट्रक बंगल्यासमोर उभे आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा बंगला केंद्रीय मंत्र्यांसाठी निश्चित करण्यात आला असून सरकारी निवासस्थानातील रहिवाशांना तो रिकामा करण्यास सांगण्यात आलंय. या बंगल्याचा नियमितपणे पक्ष संघटनात्मक बैठका आणि इतर संबंधित कार्यक्रमांसाठी वापर केला जात होता. देशातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक असलेले रामविलास पासवान यांचं ऑक्टोबर 2020 मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. 1989 पासून ते अनेक केंद्र सरकारमध्ये मंत्री होते.
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांच्यातील मतभेदांमुळं एलजेपीमध्ये फूट पडलीय. दोघंही लोजपच्या नेतृत्वासाठी ठाम आहेत. एकटा चिराग पासवान आता एलजेपीचा भाग आहे. याशिवाय, वडिलांच्या निधनानंतर त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीतही धक्का बसला होता. या निवडणुकीत ते भाजपपासून वेगळे लढले आणि त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.