हेड कॉन्स्टेबलनं CISF जवानांवर झाडल्या गोळ्या; एक ठार तर दुसरा जवान जखमी

या घटनेत जवानाचा एक वरिष्ठ सहकारी शहीद झाला आहे.
Central Industrial Security Force
Central Industrial Security Forceesakal
Updated on
Summary

या घटनेत जवानाचा एक वरिष्ठ सहकारी शहीद झाला आहे.

कोलकाता (Kolkata) येथील भारतीय संग्रहालयात तैनात असलेल्या CISF (Central Industrial Security Force) जवानानं आपल्या दोन सहकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केलं. या घटनेत जवानाचा एक वरिष्ठ सहकारी शहीद झाला, तर दुसरा अधिकारी जखमी झालाय.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गोळीबार करणारे हेड कॉन्स्टेबल ए. के. मिश्रा यांनी सहाय्यक उपनिरीक्षक रणजित सारंगी यांना AK-47 रायफलनं ठार केलं, तर सहाय्यक कमांडंट दर्जाचे अधिकारी सुवीर घोष किरकोळ जखमी झालेत. आरोपी हेड कॉन्स्टेबलचा (Head Constable) दावा आहे की, त्याला युनिटमध्ये त्रास दिला जात होता, असं त्याचं म्हणणं आहे.

Central Industrial Security Force
Gaza Violence : गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू

सीआयएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण पूर्व) सुधीर कुमार घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपी मिश्रानं आत्मसमर्पण केलंय. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना शासकीय एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं सारंगी यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सीआयएसएफनं घटनेचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of Inquiry) आदेश दिलेत. कोलकाता पोलिस (Kolkata Police) आयुक्त विनीत गोयल म्हणाले, 'संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. एका सीआयएसएफ जवानाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी आहे. आम्ही आरोपी हेड कॉन्स्टेबलला अटक केली असून पुढील तपास करत आहोत.'

Central Industrial Security Force
Agneepath Scheme : आजपासून 'अग्निपथ' योजनेविरोधात देशव्यापी आंदोलन : राकेश टिकैत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()