DY Chandrachud: CJI चंद्रचूड खुर्ची सोडून स्टूलवर का बसले?; सरन्यायाधीशांच्या हालचालीने कोर्टरुममधील सर्वजण आश्चर्यचकित

DY Chandrachud: दुपारच्या जेवणानंतर खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसण्याऐवजी तरुण वकिलांमध्ये येऊन बसले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
DY Chandrachud
DY Chandrachudesakal
Updated on

DY Chandrachud:

सर्वोच्च न्यायालयात आज औद्योगिक दारूवर कर आणि नियमन करण्याच्या राज्याच्या अधिकारांशी संबंधित मुद्द्यावर सुनावणी सुरू होती. ९ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु होती.  मुख्य न्यायमूर्ती (CJI) न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड या खंडपीठाचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, न्यायमूर्ती ए एस ओका, न्यायमूर्ती बी व्ही नागरथना, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती उज्जल भुईया, न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांचाही या खंडपीठात समावेश होता.

सुनावणी सुरू असनाता चंद्रचूड यांनी अचानक थांबवले. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करत होते. डीवाय त्यांना थांबवत म्हणाले, "तुमचे तरुण कनिष्ठ वकील दररोज लॅपटॉप घेऊन उभे असतात. मी कोर्ट मास्टरला तुमच्या मागे स्टूल ठेवण्यास सांगितले आहे जेणेकरून तेही बसू शकतील."

मेहता म्हणाले की, "तेही या सुनावणीवर लक्ष ठेवून आहेत. यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कोर्टात उपस्थित सर्व वकिलांना सांगितले की, ज्यांचा या खटल्याशी संबंध नाही, त्यांनी या तरुण वकिलांसाठी खुर्च्या रिकाम्या कराव्यात."

यानंतर दुपारच्या जेवणानंतर सुनावणी पुन्हा सुरु झाली. यावेळी आश्चर्यचकित घटना घडली. सरन्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसण्याऐवजी तरुण वकिलांमध्ये येऊन बसले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांच्या सूचनेनुसार कोर्ट रजिस्ट्रीने तरुण वकिलांसाठी जेवणाच्या वेळी स्टूल लावले होते. चंद्रचूड स्वतः त्या स्टूलवर बसले आणि ते तरुण वकिलांसाठी योग्य आहेत की नाही हे पाहिले.सरन्यायाधीशांच्या या पावलाने कोर्टरूममध्ये उपस्थित सर्व न्यायाधीश आणि वकील चकित झाले. (Supreme Court Update)

DY Chandrachud
Ajit Pawar: "दिल्लीत बायकोची पर्स फिरवत बसायला मी एवढा लेचापेचा आहे का?"; सुप्रिया सुळेंच्या टिकेचा अजितदादांनी घेतला समाचार

यावर तुषार मेहता यांनी प्रतिक्रिया दिली. सरन्यायाधीश हे उदारतेचे प्रतीक आहेत. त्यांचे आजचे पाऊल केवळ अभूतपूर्वच नाही तर सर्व न्यायालयांसाठी अनुकरणीय आहे आणि सर्व न्यायालयांनी त्याचे पालन केले पाहिजे."

न्यायालयीन व्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने कोणाच्याही नकळत तरुण वकिलांच्या दुरवस्थेचा इतका विलक्षण विचार केला आहे, हे कौतुकास्पद आणि आदरणीय आहे. आज सर्व तरुण वकिलांकडे सरन्यायाधीशांच्या दयाळूपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी भारावून गेलो आहे, असे मेहता म्हणाले. 

DY Chandrachud
Ajit Pawar News : शिवतारेंनी कोणाकोणाचे फोन आले ते दाखवलं; बारामतीतील सभेत अजित पवार मनातल सगळंच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.