"CJI चंद्रचूड यांच्या हातात बंदूक देऊन मणिपूरमध्ये पाठवा"; वादग्रस्त विधानामुळं लेखकाला अटक

यू-ट्यूबवर दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान, तक्रार दाखल होताचं पोलीसांनी ठोकल्या लेखकाला बेड्या
Dhananjay Chandrachud
Dhananjay Chandrachudsakal
Updated on

Supreme Court Insult:तमिळनाडू पोलीसांनी शनिवारी (दि.२९ जुलै)राजकीय विश्लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना अटक केली आहे. त्यांना यू-ट्युब चॅनलवरील एका मुलाखतीदरम्यान मणिपुर हिंसाचार आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर टीका केल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली. पोलीसांनुसार कलम १५३, १५३ अ आणि कलम ५०५ (१)(ब)अंतर्गत अटक करण्यात आली.

मुलाखतीमध्ये शेषाद्री म्हणाले की,"सुप्रिम कोर्टानं सांगितलंय की जर तुम्ही (सरकार) काही करु शकत नाही , तर आम्ही (सर्वोच्च न्यायालय) करु. चंद्रचूड यांना बंदूक द्या आणि तिकडे पाठवा. तेव्हा बघू ते किती शांती बहाल करु शकतात. " पुढे शेषाद्री म्हणाले की,"हा एक पर्वतीय आणि क्लिष्ट भाग आहे आणि तिकडे हत्या देखील होत राहतील. आपण हा हिंसाचार थांबवू शकतं नाही."

प्राथमिक तपास अहवालात सांगण्यात आलंय की शेषाद्री यांच्या विरोधात वकील कवियारासु यांच्याद्वारे तक्रार नोंद करण्यात आली होती. तक्रारीत वकीलांनी म्हटलं की त्यांनी २२ जुलैला यू-ट्यूबवर मुलाखतीचा व्हिडीओ पाहिला, ज्यात शेषाद्री यांनी सुप्रिम कोर्टावर आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती.

Dhananjay Chandrachud
Tariq Mansoor : मोदींच्या टीममध्ये आला मुस्लिम चेहरा! कोण आहेत तारीक मन्सुर ? भाजपच्या उपाध्यक्षपदी झाली निवड

अधिवक्ता कविअरासू यांच्या तक्रारीच्या आधारावर पेरंबलूर जिल्ह्याच्या पोलिसांनी शेषाद्री यांना अटक केली. ते कुन्नम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पोलीसांनी शेषाद्री यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (दंगल घडवण्याच्या हेतून भडकवणे), कलम १५३ (अ) (समुदायांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे) आणि कलम ५०५ (१)(ब)(जनतेत भीती निर्माण करणे) या अंतर्गत खटला नोंदवला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रमुख अन्नामलाई यांनी शेषाद्री यांच्या अटकेती निंदा केली आहे. त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षावर सामान्य माणसाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोडीत काढण्यासाठी अटकेची भीती घालण्याचा आरोप लावला आहे.अन्नामलाई यांनी ट्वीट केलं की, "सत्ताधारी द्रमुक पक्षाचा बदल्याचा एजेंडा चालवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे का?"

Dhananjay Chandrachud
Colonial Legacy Ends: 'अमृत काला'त इंडियन नेव्हीची 'ही' प्रथा होणार बंद; वसाहतवादाचा आणखी एक वारसा संपला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.