नवी दिल्ली : रामजन्मभूमी खटल्यासंबंधी देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरुन सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यातूनच समाजवादी पार्टीच्या एका खासदारानं चंद्रचूड यांना थेट शिवीगाळच केली, त्यामुळं हा वाद पेटला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना कॅमेरॅसमोरच त्यांनी शिवीगाळ केल्यानं या खासदाराला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.