एक गुजराती चहा ब्रेकमध्ये...; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ऐकवली एक मजेदार म्हण

CJI dy chandrachud funny saying gujaratis: भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी एका जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुजराती ह्यूमर बाबत भाष्य केलं.
CJI dy chandrachud funny saying gujaratis do business even during tea break
CJI dy chandrachud funny saying gujaratis do business even during tea break
Updated on

नवी दिल्ली- भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी एका जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुजराती ह्यूमर बाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, येथील लोक वेळसोबत बदल स्वीकारत आपल्या सांस्कृतिक वारशाची जोडले गेले आहेत. (CJI dy chandrachud funny saying gujaratis do business even during tea break knp94)

डीवाय चंद्रचूड म्हणाले की, स्वप्नांचा विषय निघाल्यानंतर गुजरातच्या भावनांना दर्शवणारी एक मजेदार म्हण आठवते. म्हणतात की जेव्हा सर्व जग नव्या तंत्रज्ञानाच्या मागे धावते, तेव्हा एक गुजराती साध्या गोष्टींना देखील नावीन्य देण्याचा मार्ग शोधून काढतो. उदाहरणार्थ, चहाच्या ब्रेकला एका व्यापार रणनीती बैठकीमध्ये बदलणे हे सर्वोत्कृष्ट गुजराती ह्युमर आहे, असं चंद्रचूड म्हणाले.

CJI dy chandrachud funny saying gujaratis do business even during tea break
CJI चंद्रचूड यांच्यासमोर सुरू होती सुनावणी अन् व्हिस्कीच्या बाटल्या घेऊन पोहोचले ज्येष्ठ वकील... पुढे काय झालं?

चंद्रचूड शनिवारी म्हणाले की, न्यायपालिकेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केवळ आधुनिकीकरणासाठी नाही. तर न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना सोप्प जावे यासाठीचे एक पाऊल आहे. यासाठी वकीलांना प्रशिक्षित होणं देखील गरजेचं आहे.

न्यायपालिकेतील तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अनेक अर्थाने मदत होत आहे. न्याय हे भौगोलिक किंवा तंत्रज्ञानाविषय कारणामुळे बाधित होणार नाही यासाठी आपल्याला आधुनिकीरणाचा फायदा होईल. चंद्रचूड यांनी यावेळी एआय-आधारित 'टेक्स्ट टू स्पीच कॉल- आऊट सिस्टम' याचे उद्घाटन देखील केले.

CJI dy chandrachud funny saying gujaratis do business even during tea break
'एकदम गप्प रहा, 23 वर्षात असं कधी झालं नाही'; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर भडकले

प्रत्येकांना न्याय मिळावा यासाठी न्यायालय महत्वपूर्ण स्थान ठेवते. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशा समाजाची कल्पना आपल्या संविधानाच्या आदर्शांची आधारशिला आहे. प्रत्येक नागरिकाच्या न्यायाचा अधिकार सुनिश्चित करणे हे न्यायालयाचे काम असल्याचं चंद्रचूड म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.