CJI Chandrachud: आता ट्रेन कुठल्या स्टेशनवर थांबवायची हे पण सुप्रीम कोर्टानंच सांगायचं का? CJI चंद्रचूड भडकले

काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर
prime minister modi flags off five vande bharat trains from bhopal tourism student
prime minister modi flags off five vande bharat trains from bhopal tourism studentsakal
Updated on

नवी दिल्ली : नागरिकांना आपल्या अनेक समस्यांवर तोडगा निघत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच कदाचित अनेक छोट्या मोठ्या प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी लोक विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब न करता थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावत आहेत.

अशाच एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड चांगलेच भडकले तसेच याचिकाकर्त्यांनाच त्यांनी उलट प्रश्न केला. (CJI DY Chandrachud furious on petitioner regarding Vande Bharat)

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. पण या ट्रेनला जे थांबे आहेत त्यामध्ये एक अतिरिक्त थांबा देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका एका याचिकाकर्त्यानं थेट सुप्रीम कोर्टात दाखल केली. ही याचिका सुनावणीसाठी आल्यानं त्यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड भडकले. (Latest Marathi News)

prime minister modi flags off five vande bharat trains from bhopal tourism student
Monsoon Session: नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अपात्र होणार का? अनिल परबांनी सांगितली कायदेशीर बाजू

हायकोर्टानं फेटाळली याचिका

वंदे भारत ट्रेनला मल्लपुरम जिल्ह्यातील तिरुर इथं थांबा देण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश केरळ हायकोर्टानं दक्षिण रेल्वेला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका एका वकिलानं दाखल केली होती. पण हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

त्यानंतर हायकोर्टाच्या या निर्णविरोधात संबंधीत वकिलानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण सुप्रीम कोर्टानंही ही याचिका निकाली काढली.

prime minister modi flags off five vande bharat trains from bhopal tourism student
Monsoon Session: नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अपात्र होणार का? अनिल परबांनी सांगितली कायदेशीर बाजू

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. पीएस नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाकडं ही याचिका सुनावणीसाठी आली होती. पण खंडपीठानं या याचिकेची दखल घेण्यासच नकार दिला. उलट सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं.

त्यांनी म्हटलं, "आता कुठल्या स्टेशनवर ट्रेन थांबावी हे पण आम्हीच ठरवावं असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही आता दिल्ली ते मुंबई राजधानी एक्स्प्रेसबाबतही अशाच प्रकारचे निर्णय द्यायला हवेत? हे धोरणात्मक प्रकरण आहे त्यामुळं आम्ही ही याचिका निकाली काढत आहोत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.