DY Chandrachud: CJI चंद्रचूड यांचा न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला; स्वतः ला देव अन्...

कोर्टातील तंत्रज्ञानाच्या वापरावरही चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachudsakal

कोलकाता : सरन्यायाधिश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला दिला आहे. न्यायाधिशांनी स्वतःला देव आणि कोर्टांना मंदिरं समजू नये, असं त्यांनी म्हटलं आहे. आपण लोकांची सेवा करत आहोत हे कायम लक्षात ठेवा, त्यामुळं जर तुम्ही चुकीची प्रॅक्टिस करत असाल तर ते न्याय व्यवस्थेतासाठी योग्य नाही, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. (CJI DY Chandrachud Important Advice to Judges regarding god and temple)

कोलकाताच्या नॅशनल ज्युडिशिअल अॅकेडमीच्या रिजनल कॉन्फरन्सला संबोधित करताना चंद्रचूड म्हणाले, आम्हाला नेहमीच कोर्टात लॉर्डशिप किंवा लेडीशिपच्या रुपात संबोधित केलं जातं. जेव्हा लोक म्हणतात की न्यायालय न्याय मंदिर आहे, तेव्हा ते खूपच धोकादायक बनतं. कारण आम्ही स्वतःला त्या मंदिरातील देवाच्या रुपात बघायला लागतो. जेव्हा कोर्टाचा उल्लेख कोणी न्याय मंदिर असा करतो तेव्हा मला संकोच वाटतो, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

CJI DY Chandrachud
Andheri RTO Scam: "RTO मधून तब्बल ७६ हजार बनावट ड्रायव्हिंग लायसन्स जारी"; वडेट्टीवारांचा सभागृहात गंभीर आरोप

उलट मी न्यायाधिशांची भूमिका ही लोकसवेकाची भूमिकेशी परिभाषित करु इच्छितो. कारण जेव्हा लोकांची सेवा करणाऱ्याच्या रुपात तुम्ही स्वतःला पाहता तेव्हा तुमच्यात करुणा, सहानुभूती, न्यायाची धारणा निर्माण होते. त्याचबरोबर तुम्ही इतरांबाबत जजमेंटल होत नाही. यामुळं एखाद्याला शिक्षा सुनावतानाही न्यायाधिश करुणेच्या भावनेनं विचार करतात. कारण शेवटी एका मनुष्याला शिक्षा सुनावली जाणार असते.

CJI DY Chandrachud
Fraud PM Kisan App: सावधान! व्हॉट्सअॅपवर 'पीएम किसान ॲप'ची लिंक अन् शेतकऱ्यांचे सात लाख गायब

संविधानिक नैतिकतेची ही कन्सेप्ट केवळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टांच्या न्यायाधीशांसाठी नाही तर जिल्हा कोर्टांसाठी देखील महत्वाची आहे. कारण सामान्य नागरिकांची भागिदारी सर्वात आधी आणि सर्वात महत्वपूर्ण रुपात जल्हा कोर्टांपासून सुरु होते. यावेळी चंद्रचूड यांनी कोर्टातील तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील भर दिला. कोर्टातील अडचणींवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.

CJI DY Chandrachud
Sanjay Jha: संजय झा यांची जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती; बिहारमध्ये नव्या राजकारणाला सुरुवात

सीजेआय चंद्रचूड म्हणाले, सर्वसामान्य लोकांपर्यंत निर्णय पोहोचणं आणि ते समजून घेण्यात भाषा ही एक मुख्य अडचण आहे. तंत्रज्ञान यावर आपल्याला काही पर्याय देऊ शकतं. जास्तकरुन आदेश हे इंग्रजीत लिहिले जातात. पण आता आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीनं या आदेशांचा अनुवाद करण्यास सक्षम बनलो आहोत. आम्ही सध्या ५१,००० भाषांचं इतर भाषांमध्ये अनुवाद करत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com