CJI Chandrachud On AI : सीजेआय चंद्रचूड यांचे 'एआय'बाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले...

CJI Chandrachud
CJI ChandrachudEsakal
Updated on

देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच चंद्रचूड यांनी सध्या चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता याविषयी महत्वपूर्व टिप्पणी केली आहे. ते आयआयटी चेन्नईच्या 60 व्या दीक्षांत समारंभात सीजेआय बोलत होते.

जेथे सोशल मीडीयामुळे लोक एकमेकांच्या जवळ आलेत, तंत्रज्ञानाच्या वापराने वयांमधील फरक संपवला, मात्र ऑनलाईन शिवीगाळ तसचे ट्रोलिंग सारखे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बाबत देखील गैरवापर, चुकीची माहिती पसरवणे आणि धमक्या देण्यासारखे प्रकार होण्याचा धोका आहे. तांत्रिक क्षेत्रातील तुम्हा सर्वांसमोरील त्यावर मात करणे हे एक मोठे आव्हान आहेत चेन्नई आयआटीच्या 60 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना विद्यार्थ्यांना उद्देशून ते बोलत होते.

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी पुढे बोलताना आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याच्या धोक्यापासून देखील सावध केलं. ते म्हणाले, हे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात पोहोचले आहे, परंतु मूलभूत मानवी मूल्ये आणि वैयक्तिक गोपनीयतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे, तरच गैरवापर थांबेल.

तरुणांसमोर मी दोन प्रश्न उपस्थित करत आहे, हे तुम्ही स्वतःला विचारा. पहिला, आपले तंत्रज्ञान कोणत्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते? दुसरा, लोकांसाठी ते किती सोयीचे आहे? येथे मूल्य म्हणजे तुमच्या कल्पना, नवकल्पना किंवा तंत्रज्ञानाचे आर्थिक मूल्य नाही तर हे तंत्रज्ञान कोणत्या तत्त्वांवर तयार करण्यात आली आहे? ते कोणत्या मूल्यांना चालना देईल, विशेषत: ज्या संदर्भात तुम्ही ते मांडत आहात?

CJI Chandrachud
Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी आठवण करून दिली की, एआय आधारित नोकर भरती दरम्यान अनेक पक्षपात आणि भेदभाव समोर आले आहेत. ते म्हणाले की कोणतेही तंत्रज्ञान जेव्हा वास्तविक जगात वापरले जाते तेव्हा ते निरपेक्ष राहू शकत नाही. या कारणास्तव, तांत्रिक वापरादरम्यान काही मानवी मूल्यांचे प्रतिनिधित्व करणे आणि ते राखणे आवश्यक आहे.

CJI Chandrachud
Udhhav Thackeray News : सर्वात मोठा गौप्यस्फोट होणार! उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर रिलीज

सीजेआय डी वाय चंद्रचूड पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाचे अस्तित्व शून्यात असू शकत नाही त्यामुळे त्यांचा वापर सर्वांना सुलभ व्हावा यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. या तंत्रज्ञानाच्या बाबतीत सामान्य लोकांमध्ये त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य गमावण्याबद्दल घबराहट असू नये, तसेच तयांचा वापर विश्वासार्ह असावा. सोशल मीडियाने लोकांना जोडले आहे, तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये वयातील फरक दूर केला आहे, मात्र ऑनलाइन गैरवर्तन आणि ट्रोलिंग सारख्या नवीन प्रकार देखील पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, एआयबाबत देखील गैरवापर, चुकीची माहिती आणि धमकावले जाण्याचे प्रकार होणे असे धोके आहेत असेही चंद्रचूड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.