DY Chandrachud: "उद्या तुम्ही माझ्या घरी येणार अन् माझ्या पर्सनल..."; CJI चंद्रचूड वकिलावर का रागावले? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

CJI DY Chandrachud Strict Response to Lawyer's Overstep in Court: सुप्रीम कोर्टाचे सीजेआई डीवाय चंद्रचूड कोर्टातील शिस्त मोडणाऱ्या वकिलावर संतापले. आदेशावर सह्या नसतानाही बदल सुचवणाऱ्या वकिलाला त्यांनी कडक शब्दांत फटकार लावली.
CJI DY Chandrachud scolds a lawyer in Supreme Court over interference in a pending court order.
CJI DY Chandrachud scolds a lawyer in Supreme Court over interference in a pending court order.esakal
Updated on

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टातील शिस्तीचे पालन करण्यावर नेहमीच जोर दिला आहे. त्यांनी गुरुवारी कोर्टातील एका घटनेवर वकिलाला कडक शब्दांत फटकार लावली. एक वकील न्यायालयाच्या आदेशात बदल सुचवण्यासाठी पुढे आला, मात्र त्यावेळी आदेशावर न्यायमूर्तींच्या सह्या झालेल्या नव्हत्या. ही कृती पाहून सीजेआय चंद्रचूड वकिलावर चांगलेच संतापले आणि त्याच्यावर राग व्यक्त केला.

कोर्टाच्या आदेशावर वकिलांची लुडबुड

मध्यस्थीच्या एका प्रकरणात वकीलाने याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील बेंचमध्ये चालू होती. कोर्टाने आदेश डिक्टेट केला होता, पण त्यावर अद्याप न्यायमूर्तींच्या सह्या झालेल्या नव्हत्या. त्याच वेळी वकील बेंचसमोर आला आणि आदेशात बदल सुचवू लागला. हे पाहून सीजेआय चंद्रचूड यांनी विचारले, "तुम्हाला कसे कळले की काय आदेश दिला गेला आहे, कारण अजून तर न्यायमूर्तींनी साइन केलेलेच नाहीत."

वकिलाचा खुलासा आणि सीजेआयचा संताप

वकिलाने उत्तर दिलं की त्याला कोर्ट मास्टरने माहिती दिली आहे की आदेशात काय म्हटलं आहे. हे ऐकून सीजेआय चंद्रचूड आणखी चिडले आणि म्हणाले, "तुमची हिम्मत कशी झाली कोर्ट मास्टरकडून माहिती घेण्याची आणि हे समजण्याची की काय डिक्टेट केलं आहे?" ते पुढे म्हणाले, "अंतिम आदेश तोच असतो ज्यावर न्यायमूर्तींच्या सह्या असतात, आणि माझ्याबरोबर असा मजाक कधीच खपणार नाही.

CJI DY Chandrachud scolds a lawyer in Supreme Court over interference in a pending court order.
Jawan Found After 56 Years: 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

सीजेआईंच्या कारकि‍र्दीतील कठोर निर्णय

सीजेआय चंद्रचूड यांनी रागाने वकीलाला म्हटलं, "उद्या तुम्ही माझ्या घरी येणार आणि माझ्या पर्सनल सचिवाकडून विचारणार की मी काय करत आहे का?" त्यांनी पुढे सांगितले की, "माझं कार्यकाळ जास्त उरलेलं नाही, पण माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत मीच इथे बॉस राहणार."

सीजेआय चंद्रचूड यांची निवृत्ती 10 नोव्हेंबरला होणार आहे, परंतु त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा कोर्टातील कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी न्यायपालिकेतील सख्त शिस्त पाळण्याचं आवाहन केलं आहे.

CJI DY Chandrachud scolds a lawyer in Supreme Court over interference in a pending court order.
'पतीपेक्षा दीर हँडसम, तोच सुंदर मुलगा देऊ शकेल म्हणून महिला घरातून पळाली, सासरच्यांनी गाठलं पोलीस स्टेशन

Related Stories

No stories found.