मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या सुनील प्रभू आणि शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आजच्या सुनावणीला विशेष महत्त्वाचे मानले जात आहे, कारण 10 नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड निवृत्त होत आहेत. त्यामुळे आज त्यांच्याकडून काही महत्त्वाचे निर्देश येण्याची शक्यता आहे.