नवी दिल्ली : धनंजय चंद्रचूड हे आज सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना हे आता सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मैलाचा दगड ठरावेत असे अनेक महत्त्वपूर्ण आदेश दिले. देशाचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावर देखील याचे दूरगामी परिणाम होतील. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये निकाल देणाऱ्या पीठांमध्येही चंद्रचूड यांचा समावेश होता. वडील यशवंतराव चंद्रचूड यांचा निष्पक्ष न्यायदानाचा वारसा धनंजय चंद्रचूड यांनीही जपला.