सुप्रीम कोर्टत आज (मंगळवार) NEET-UG पेपर लीक प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि वरिष्ठ वकील मैथ्यूज नेदुम्परा यांच्यात तीव्र वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मुख्य न्यायाधीशांनी नेदुम्परांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षक बोलावण्यास सांगितले.
NEET-UG पेपर लीक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, एका याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील नरेंद्र हुड्डा आपली बाजू मांडत होते. त्याच वेळी नेदुम्परांनी "मला काही बोलायचे आहे" असे म्हणत त्यांना मध्येच थांबवले. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी त्यांना हुड्डांच्या बोलण्यानंतर बोलण्यास सांगितले. मात्र नेदुम्परांनी उत्तर देत "मी येथे सर्वात वरिष्ठ आहे" असे म्हटल्यावर मुख्य न्यायाधीश चंद्रचूड चिडले.
मुख्य न्यायाधीश चंद्रचूडन यांनी नेदुम्परांना ताकीद देत म्हटले, "मी तुम्हाला वार्निंग देतो. तुम्ही या प्रकारे बोलू शकत नाही. मी या कोर्टचा इंचार्ज आहे. सुरक्षा रक्षक बोलवा आणि यांना बाहेर काढा." त्यावर नेदुम्परांनी उत्तर दिले की त्यांना स्वतःहून जाण्याची गरज आहे, त्यांना काहीही सांगण्याची गरज नाही.
मुख्य न्यायाधीशांचे उत्तर
मुख्य न्यायाधीशांनी नेदुम्परांना उत्तर देत म्हटले, "तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. मी न्यायालयाला 24 वर्षे पाहिले आहे. मी वकिलांना कोर्टाच्या कार्यवाईत अशा प्रकारे वागू देऊ शकत नाही."
त्यावर नेदुम्परांनी म्हटले, "मी 1979 पासून पाहतो आहे. नेदुम्परांच्या या वागणुकीवर मुख्य न्यायाधीशांनी त्यांना वार्निंग देत म्हटले की, "माझ्याकडून तुम्हाला नोटिस जारी करावी लागेल."
न्यायाधीशांची मागितली माफी-
पुढील सुनावणी सुरू होण्यापूर्वी नेदुम्परांनी मुख्य न्यायाधीशांची माफी मागून सांगितले की, "सॉरी, मला माफ करा.... मी काही चुकीचे केले नाही. मी ही चर्चा ऐकून चकित झालो आहे. आम्ही येथे क्रिमिनल ट्रायल करत आहोत आणि CBI बरोबर चर्चा करत आहोत. कोणत्याही साधारण व्यक्तीला विचारा की पेपर लीक झाला आहे की नाही. फेर परिक्षेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. हा मुद्दा 20 मिनिटांत संपला पाहिजे होता. संसदेतही NEET मुद्दा आहे. हा प्रशासनाशी संबंधित मुद्दा आहे आणि सरकारने या वर ठोस पावले उचलली पाहिजेत."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.