Supreme Court : भारताचे सरन्यायाधीश एन व्ह रमणा निवृत्तीच्या एकदिवस आधी देशातील सर्वात महत्त्वाच्या अशा तीन खटल्यांची सुनावणी करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेगासस, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका, PMLA निकालाविरूद्ध पुनरावलोकन यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांवर निवृत्तीपूर्वी रमना नेमका काय निकाल देणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले आहे. येत्या 26 ऑगस्ट म्हणजे उद्या रमना सेवानिवृत्त होत आहेत. त्यापूर्वी आज वरील अतिमहत्त्वाच्या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
सुनावाणी होणारी प्रकरणं नेमकी कोणती?
पेगासस हेरगिरी प्रकरण
फोन हॅक करून भारतातील राजकारणी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करणाऱ्या पेगासस हेरगिरी प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पेगॅसिस स्पायवेअरसंबंधी स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीने त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला असून, आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 2017 मध्ये झालेल्या भारत-इस्रायल संरक्षण करारावेळी भारताने पेगाससची खरेदी केल्याचे वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिले. मोदी सरकारनं 2017 साली संरक्षण सौद्याच्या पॅकेजमध्ये इस्त्रायलकडून पेगासस खरेदी केले आहे.
पीएमएलए कायद्यावरील सुनावणी
याशिवाय आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर पीएमएलए कायद्यावर सुनावणी होणार आहे. नुकतेच 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील ईडीला अटक, छापा, समन्स, निवेदन यासह दिलेले सर्व अधिकार कायम ठेवले होते. पीएमएल कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या तब्बल 250 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सर्वांवर एकत्रित सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. 27 जुलैला सुनावण्यात आलेला निकाल संविधानाच्या कलम 20 आणि 21 द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत संरक्षणांच्या विरोधात असल्याचे याचिकेत दावा करण्यात आला आहे.
बिल्कीस बानोच्या याचिकेवर होणार सुनावणी
गोध्रा हत्याकांडानंतर 2002 मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 जणांची नुकतीच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णया विरोधात बिल्किन्स बानो यांनी या विरोधात याचिका दाख केली आहे. त्यावर आज सुनावणी पार पडणार आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुजरात सरकारने स्थापन केलेल्या समितीने सर्व 11 आरोपींच्या सुटकेचा निर्णय घेतला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.