क्लास वन अधिकारी, पाच लाखांची लाच अन् चौथ्या मजल्यावरुन उडी; गुजरातमधील घटनेने देश हादरला

Rajkot, Gujarat News
Rajkot, Gujarat Newsesakal
Updated on

Rajkot, Gujarat News : गुजरातच्या राजकोट येथील वर्ग एकचे अधिकारी जवरीमल बिश्नोई यांना काल सीबीआयने ५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली होती. मात्र आज सकाळी या अधिकाऱ्याने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परकीय व्यापार संचालनालयाचे संयुक्त संचालक जवरीमल बिश्नोई यांना सीबीआयने पाच लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक केली होती. या कथित लाचेच्या प्रकरणात सीबीआयने सापळा रचून कारवाई केली होती.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीजीएफटीचे संयुक्त संचालक जेएम बिश्नोई यांनी फूड कॅनच्या निर्यातीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. बिश्नोई यांनी पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपयांची मागणी केली होती. उर्वरित रक्कम एनओसी देतांना देण्याचे ठरले होते.

Rajkot, Gujarat News
Eknath Shinde : राहुल गांधींनीच देशद्रोह केला, मुख्यमंत्री शिंदेंचा 'नेमका' प्रहार

या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि बिश्नोई यांना पाच लाख रुपये घेतांना रंगेहात पकडले. आज सकाळी कार्यालयातल्या चौथ्या मजल्यावरुन जवरीमल बिश्नोई यांनी उडी घेत जीव दिला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.