Climate Change : हवामान बदलाचा परिणाम थारच्या वाळवंटावरही दिसून येईल. एकीकडे हवामान बदलामुळे जगभरातील वाळवंटांचे तापमान वाढणार असल्याचा दावा संशोधक करत असताना दुसरीकडे थारबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.
हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभर पाहायला मिळत आहेत. कुठे लाखो वर्ष जुन्या हिमनद्या वितळत आहेत तर कुठे जीवघेण्या वाळवंटात हिरवळ दिसत आहे. आपला देशही हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून लांब राहिलेला नाहीये. त्यामुळे या शतकाच्या अखेरीस भारतातील थारचे वाळवंट हिरवेगार होईल, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
थारच्या वाळवंटात हिरवळ दिसेल
थारचे वाळवंट हे कोरड्या आणि नापीक जमिनीसाठी ओळखले जाते. राजस्थान हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे वाळवंट आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, हवामान बदलाचा परिणाम थारच्या वाळवंटावरही दिसून येईल. एकीकडे हवामान बदलामुळे जगभरातील वाळवंटांचे तापमान वाढणार असल्याचा दावा संशोधक करत असताना दुसरीकडे थारबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. या शतकाच्या अखेरीस थारचे वाळवंट हिरवेगार होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
थारचे वाळवंट राजस्थान, पंजाबचा काही भाग आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतापर्यंत पसरलेले आहे. 2 लाख चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे वाळवंट जगातील 20 वे सर्वात मोठे आणि उप-उष्णकटिबंधीय वाळवंटातील 9 व्या क्रमांकावर आहे.
जगातील वाळवंटातील तापमानात वाढ
हवामान बदलामुळे पृथ्वीवरील वाळवंटांचे तापमान वाढत असल्याचा दावा गेल्या काही वर्षांत अनेक अभ्यासांतून करण्यात आला आहे. तज्ञांचा अंदाज आहे की 2050 पर्यंत सहारा वाळवंटाचा आकार 6000 चौरस किलोमीटरने वाढेल.
जर्नल अर्थ्स फ्यूचरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, थारच्या वाळवंटाचे भवितव्य इतर वाळवंटांपेक्षा वेगळे असेल. संशोधन पथकाला असे आढळून आले की 1901-2015 दरम्यान भारताच्या वायव्य भागात आणि पाकिस्तानच्या काही भागात पावसाचे प्रमाण 10-50 टक्क्यांनी वाढले. येत्या काळात पावसात 50 ते 200 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
वाळवंटातील हवामान बदलेल का?
येत्या काळात मान्सूनचा वेगळा ट्रेंड पाहायला मिळणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भारतीय मान्सूनचा पश्चिमेकडे विस्तार होईल. त्यामुळे भारताच्या पश्चिम आणि वायव्य भागात दमट 'मान्सून' हवामान दिसून येईल.
गुवाहाटीतील कॉटन युनिव्हर्सिटीचा भौतिकशास्त्र विभागातील बीएन गोस्वामी म्हणतात की, भारतीय वाळवंटातील हंगामी बदल समजून घेण्यासाठी भारतीय उन्हाळा समजून घेणे आवश्यक आहे. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, हंगामी बदलांमुळे परिसरातील शेतीमध्ये वाढ होईल तसेच सामाजिक-आर्थिक बदल होतील.
संशोधकांनी सांगितलं आहे की, नव्या संधींबरोबरच या हंगामी बदलामुळे अनेक समस्याही येतील. थारच्या वाळवंटात येणार्या हिरवळीमुळे त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे. सध्या या विषयावर अभ्यास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.