नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दुर्गम भागात असणाऱ्या गावामध्ये सकाळी ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. दरम्यान आता अमरनाथ गुहेजवळही ढगफुटी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमध्ये बीएसएफ आणि सीआरपीएफच्या कँपचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र, या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. ज्यावेळी ही ढगफुटी झाली त्यावेळी अमरनाथ गुहेच्या आत कुणीही पर्यटक उपस्थित नव्हते.
अमरनाथ गुहेजवळ आधीपासूनच एसडीआरएफच्या दोन टीम्स उपस्थित आहेत. मात्र, प्रशासनाने आणखी एक अतिरिक्त टीम घटनास्थळी पाठवली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, ढगफूटी होत असताना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं सावट होतं.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा गेल्या दोन वर्षांपासून रद्द केली आहे. जर यात्रा सुरु असती तर या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित झाली असती, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.