Cloudburst : हिमालयात वारंवार ढगफुटी का होते? ढगफुटी म्हणजे नेमकं काय?

हिमाचल प्रदेशातील ढगफुटीची तिसरी घटना
Cloudburst
Cloudburst esakal
Updated on

Cloudburst : हिमाचल प्रदेशातील ढगफुटीची ही तिसरी घटना आहे. राज्यातील सोलनमध्ये रात्री उशिरा ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला. ढगफुटीची घटना कशी घडते ते जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी इतर 6 जणांना वाचवण्यात यश आले. ढगफुटीची घटना रविवारी उशिरा सोलनच्या धायवाला गावात घडली. ढगफुटीमुळे एक गोठाही वाहून गेला. या घटनेनंतर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी 26 जुलै 2023 रोजी हिमाचल प्रदेशातील रामपूर भागात रात्री उशिरा ढगफुटीची घटना घडली होती, ज्यामध्ये प्राथमिक सरकारी शाळेसह एकूण 6 घरे वाहून गेली होती. यात जीवितहानी झाली नसली तरी दुसरीकडे, 17 जुलै रोजी कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. उत्तराखंडमध्येही 22 जुलै 2023 रोजी ढगफुटीची घटना घडली होती, संपर्क रस्ता तुटल्याने जवळपास 200 गावांचा संपर्क तुटला होता. मात्र ढगफुटी म्हणजे नक्की काय? ती कशी होते? त्याचे काय परिणाम होतात? आत्तापर्यंत सर्वात मोठी ढगफुटी कधी आणि कुठे झाली आहे?

Cloudburst
Health Tips: वाढणारं वजन कमी करणार आले, पोटाचा घेर होणार कमी

लेहमध्ये 6 ऑगस्ट 2010 रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.

Cloudburst
Sadhguru Eating Tips : भारतीय परंपरेतच आहे आरोग्याचा खजिना; जेवणातून पूर्ण पोषण मिळण्यासाठी सद्गुरुंनी दिल्या खास टिप्स

गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते. गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी 3.5 मिमीहून मोठे आकारमान होते.

Cloudburst
Shravan Fasting Tips : श्रावणात उपवास करताय? मग जाणून घ्या काय खावे काय नाही... अशी घ्या काळजी

काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.

Cloudburst
Health Tips : शरीरात या कॅल्शिअमची कमी असेल तर Muscles Cramps जास्तच दमवतात!

हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी 12 किमी असतो. तो बघता बघता ताशी 80 ते 90 किमीपर्यंत पोहोचतो.

Cloudburst
Vastu Tips: आर्थिक संकटात आहात? मग देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवाच!

हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी 12 किमी असतो. तो बघता बघता ताशी 80 ते 90 किमीपर्यंत पोहोचतो.

Cloudburst
Palazzo Fashion Tips: रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

Cloudburst
Sadhguru Eating Tips : भारतीय परंपरेतच आहे आरोग्याचा खजिना; जेवणातून पूर्ण पोषण मिळण्यासाठी सद्गुरुंनी दिल्या खास टिप्स

वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात.

Cloudburst
Shravan Fasting Tips : श्रावणात उपवास करताय? मग जाणून घ्या काय खावे काय नाही... अशी घ्या काळजी

ढगफुटी ही हिमालयासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता.

Cloudburst
Vastu Tips: आर्थिक संकटात आहात? मग देव्हाऱ्यात 'या' वस्तू ठेवाच!

त्या दिवशी आठ तासात 950 मिमी पाऊस पडला. वेग व थेंबांचा आकार आणि पाणी घेऊन येणारा हवेचा स्तंभ जमिनीवर आदळल्यावर होणारे परिणाम यामुळे ढगफुटीतून अपरिमित नुकसान होते. यावर उपायही काही नसतो. निसर्ग मस्तीत येऊन धुमाकूळ घालतो. हे त्याचे तांडवनृत्य असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.