खलिस्तानबद्दलच्या केजरीवालांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी - चन्नी

अरविंद केजरीवाल यांनी खलिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
खलिस्तानबद्दलच्या केजरीवालांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी - चन्नी
Updated on

Punjab Assembly Elections 2022 : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेस, भाजप, आप आणि स्थानिक पक्षांनीही केलेल्या जोरदार तयारीमुळे ही निवडणुक आता चर्चेचा विषय ठरतेय. त्यातच काल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बिहार आणि दिल्लीतील भय्यांना पंजाबमध्ये घुसू द्यायचे नाही, या मंडळींना येथे राज्य करू द्यायचे नाही त्यासाठी सर्व पंजाबी नागरिकांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे भाजप आणि आपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता चन्नींनीही केजरीवालांना एका वक्तव्यावरून धारेवर धरलं आहे.

खलिस्तानबद्दलच्या केजरीवालांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी - चन्नी
युपीत पाच वर्षांनी दिसलं 'हे' चित्र; योगींना शह देणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल काही धक्कादाय खुलासे करताना कुमार विश्वास यांनी गंभीर वक्तव्य केली आहेत. ते म्हणाले की, केजरीवालांना मागच्याच निवडणुकीत आपण सांगितलं होतं की, फुटीरतावाद्यांपासून दुर राहा, त्यांची मदत घेऊ नका. त्यावर केजरीवाल म्हणाले होते की, तुम्ही काळजी करू नका. एक तर मी एका राज्याचा मुख्यमंत्री होईल किंवा एका स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राचा पंतप्रधान होईल. त्यानंतर आता चन्नींनी त्यांच्या या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

खलिस्तानबद्दलच्या केजरीवालांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी - चन्नी
चेहरा झाकून कॉलेजमध्ये प्रवेश नाही; युपीमध्येही 'हिजाब'चे पडसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.