अमृतसर : काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि विद्यामान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CM Channi) हे पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. पण या दोन्ही जागांवरुन त्यांचा पराभव होणार आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल (Arvind Keriwal) यांनी एका सर्व्हेच्या आधारे केला आहे. (CM Charanjeet Singh Channi will be defeated from both seats Arvind Kejriwal claim)
पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, चन्नी साहेब चाककौर साहिब आणि भदौर या दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी आम्ही तीन वेळा सर्वेक्षण केलं आहे. या सर्व्हेमध्ये चन्नींचा या दोन्ही जागांवरुन जोरदार पराभव होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चन्नींना चामकौरमधून ३५ टक्के तर आपच्या उमेदवाराला ५२ टक्के मतं मिळतील. तर भदौर इथून आपला ४८ टक्के तर चन्नींना ३० टक्के मतं मिळतील असंही केजरीवाल यावेळी म्हणाले. त्यामुळं जर चन्नी हे आमदारच होऊ शकणार नाहीत तर ते मुख्यमंत्री कसे होतील? असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे जर जिंकले तर वाळू खाण घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करतील, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले. चन्नींच्या नातेवाईकाकडं मिळालेलं घबाड हे चन्नींशीच संबंधित असल्याचं त्यांनी ईडीला सांगितलं असतानाही ईडी त्यांना अटक का करत नाहीए? असा सवालही त्यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.