CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची शरयू नदीकाठी महाआरती; माघारी फिरताना म्हणाले….

CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
Updated on

अयोध्या : मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या अयोध्या यात्रेची आज सांगता झाली. महाराष्ट्रातून स्पेशल रेल्वेने शिवसैनिकांसह ही यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान आज शरयू नदीच्या महाआरतीने शिंदेंच्या या यात्रेचा शेवट झाला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी या यात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली.

आज अयोध्या दौऱ्याच्या निमीत्ताने हजारो शिवसैनिक याठिकाणी उपस्थित होते. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यानंतर यात्रेबद्दल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही सगळं पाहाता आहात. प्रभु रामचंद्रांची ही अयोध्या यात्रा कालपासून सुरू झाली आणि आज त्याचा समारोप होतोय.

सकाळी राम लल्लाचं दर्शन घेतलं आरती केली, भव्य दिव्य राममंदिर निर्माणाचं काम पाहिलं नंतर हनुमान गढीला दर्शन घेतलं त्यानंतर लक्ष्मण किल्ल्यामध्ये दर्शन घेतलं. संत महंतानी आशीर्वाद दिला, त्याचा देखील एक कार्यक्रम होता आणि अखेर शरयू नदीच्या आरतीने या यात्रेची सांगता झाली अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
Ajit Pawar News : साताऱ्यात अजित पवारांचा भाजपला दणका! शेकडो कार्यकर्त्यांसह बडा नेता राष्ट्रवादीत
CM Eknath Shinde performs Maha Aarti at the banks of Sarayu River in Ayodhya Uttar Pradesh
"बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात…हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?"

अयोध्या यात्रेचा समारोप झाला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यात्रेत सहभागी झालेल्या हजारो रामभक्तांचं अभार मानले. यानंतर एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.