लखनऊः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लखनऊ विमानतळावर दाखल झालेले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी लखनऊ विमानतळावर दाखल झालेले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लखनऊ ते अयोध्या भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच अयोध्येला येत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेचे नेते लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे एक मंत्री त्यांच्या स्वागताला दाखल झाले होते. विमानतळ परिसरात रामभक्तांची गर्दी झाली होती. पुष्पहारांनी सर्वांचं स्वागत करण्यात आलं.
पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली चूक आम्ही सुधरवली आहे. आम्ही लोकांच्या मनातलं सरकार आणलेलं आहे. असं असलं तरी अयोध्येत आम्ही पक्षिय राजकारण आणणार नाही. आम्ही प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लखनऊ ते अयोध्या श्रद्धेचं वातावरण तयार झालेलं आहे
प्रभू रामचंद्राच्या चरणी मी नतमस्तक होतो
अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येथे आलो
रामभक्तांनी भगवं हिंदुत्वाचं माहोल बनलं आहे
प्रभू रामचंद्रांच्या आशीवार्दाने आम्ही सरकार स्थापन केलं
२०१९मध्ये चूक झाली होती. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं
अयोध्येत आम्ही पक्षिय राजकारण आम्ही आणणार नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.