या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आपापसात भिडले आहेत.
सध्या हिमाचल प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अनेक राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांमध्ये येथे तणावाचे वातावरण निर्माण झालेले असते. दरम्यान, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा निषेध करण्यासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते आपापसातच भिडले असल्याची घटना घडली आहे. कुल्लू जिल्ह्यात ही घटना असून राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरु आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ही नविन घटना नसून अशा कार्यक्रमांवेळी तणाव निर्माण होत असल्याच्या बातम्या याआधीही समोर आल्या आहेत.
कॉंग्रेसने आगामी निवडणुकीची रणनीती आखण्याची तयारी केली आहे. यासाठी कुल्लू जिल्ह्यातील काँग्रेसच्यावतीने आंबेडकर भवन येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीसाठी काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव संजय दत्त आणि कुल्लू जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बुधीसिंह ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक आपापसात भिडले आहेत. त्यामुळे याठिकाणी काही काळासाठी तणावपू्र्ण वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी हिमाचल काँग्रेसचे सहप्रभारी संजय दत्त यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने प्रचंड गोंधळ पसरला. या बैठकीसाठी जिल्हा कुल्लू काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष व्यासपीठावरून संघटनेबाबत बोलत होते. त्यावेळी त्यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी बैठकीतून उठून भवनाबाहेर सहप्रभारींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान, बैठकीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना सरकारी जमीन खासगी ट्रस्टला दिल्याबद्दल काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी जवळपास तासभर पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. येथील एका खासगी ट्रस्ट असलेल्या रुग्णालयाची पायाभरणी मुख्यमंत्री ठाकूर यांनी केली असून सरकारी जमीन कोट्यवधींची असून खासगी संस्थेला जमीन देण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.