तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात मोठ्या एन्ट्रीच्या तयारीत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) राष्ट्रीय राजकारणात मोठ्या एन्ट्रीच्या तयारीत आहेत. जूनमध्ये राष्ट्रीय पक्ष सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. यापूर्वी केसीआर (KCR) यांनी विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती.
भारतीय जनता पक्षाविरोधात (BJP) मोर्चेबांधणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अलीकडंच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एका मोठ्या बातमीचे संकेत दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या पक्षाबाबत अंतिम निर्णय 19 जूनला होणार आहे. शुक्रवारीच मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्री आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. 'भारत राष्ट्र समिती'च्या नावावर एकमत झाल्याचं मानलं जातंय. त्याचबरोबर या पक्षाची निवडणूक आयोगाकडं नोंदणीची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर केसीआर म्हणाले होते, 'लवकरच देशात खळबळ उडेल.' भाजप आणि काँग्रेसविरोधी (Congress) शक्तींना एका व्यासपीठावर आणण्यात अपयशी ठरल्यानंतर केसीआर यांनी राष्ट्रीय पक्ष घोषित करण्याचा विचार केल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
गेल्या काही महिन्यांत शिवसेना, NCP, DMK, RJD, SP आणि JD(S) यासह अनेक राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेसच्या पर्यायाबाबत कोणत्याही आघाडीवर एकमत होऊ शकलेलं नाहीत. विशेष म्हणजे, अनेक प्रयत्नांनंतरही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि केसीआर यांच्यात बैठक होऊ शकलेली नाहीय. तसंच ओडिशाचे सीएन नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांना सोबत आणण्यात चंद्रशेखर राव अयशस्वी ठरले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.