नवी दिल्ली : राजकीय पटलावर टोकाचे मतभेद असले तरी सामान्य आयुष्यात भिन्न मतप्रवाहांच्या नेत्यांचे संबंध ‘मधुर’ असू शकतात, याची प्रचिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील ‘शाब्दिक युद्ध’ विसरुन त्यांनी पंतप्रधानांना विशेष भेट पाठविली आहेत. ही भेट म्हणजे बंगालचे गोड चवीचे आंबे आहेत.
राजकारणात अनेक रंग दाखविणाऱ्या ममता बॅनर्जी या आंब्यांच्या हंगामात दिल्लीतील विविध पक्षांच्या नेत्यांना आंब्यांची भेट आवर्जून पाठवत असतात. गेल्या आठवड्यात त्यांना बंगालमधील ‘हिमसागर’, ‘माल्डा’ आणि ‘लक्ष्मणभोग’ या जातीच्या आंबे पंतप्रधानांना पाठविले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही आंब्याच्या पेट्यांची भेट दिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंब्यांचा गोडवा चाखायला मिळाला आहे.
बॅनर्जी यांच्या ‘मँगो डिप्लोमसी’मुळे केंद्र व राज्य सरकारमधील कडवटपणा कमी होतो का, मुद्दा गौण ठरवीत आंब्यांच्या भेटीची परंपरा गेल्या दहा वर्षांपासून अखंड सुरू आहे. २०११ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून त्या दिल्लीतील नेत्यांना आंब्यांचा भेट पाठवत आहेत. मोदी यांनी २०१९मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ‘दीदी माझ्यासाठी आजही कुर्ते पाठवितात, असे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या २०१९ या वर्षात ममता बॅनर्जी यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना कुर्ते व मिठाई दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.