बिहारमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.
Nitish Kumar Tejashwi Yadav News : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. नुकतेच नितीश कुमार भाजपची (BJP) साथ सोडून राजदमध्ये दाखल झाले. लवकरच ते मुख्यमंत्रिपदाची खुर्ची तेजस्वी यादव यांच्याकडं सोपवणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर नितीश कुमार केंद्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचंही मानलं गेलं.
मात्र, आरजेडीसोबत युती करूनही नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या नव्या सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. सध्या नितीश कुमार केंद्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसू लागले आहेत. 2024 मध्ये नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले, तर बिहारची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कुणाकडं असेल, या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. यामध्ये तेजस्वी यादव यांचं नाव अजूनही आघाडीवर आहे. खुद्द नितीशकुमार यांनीही तसे संकेत दिले आहेत.
नितीश कुमार मंगळवारी पाटण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून संबोधित केलं. हे ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले आणि नितीश कुमार यांच्याकडं पाहू लागले. आता भलेही त्यांची बोलताना जीभ घसरली असेल, पण नितीशकुमार यांच्याबाबत चर्चा होणं स्वाभाविक आहे. नितीश कुमार काल नवनियुक्त पशुवैद्यकीय अधिकारी आणि मत्स्य विकास अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
गेल्या काही महिन्यांतील घडामोडींवर नजर टाकल्यास नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. तेव्हापासून त्यांच्याकडं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. आता नितीश कुमार याविषयी उघडपणे बोलत नसले, तरी ते ज्या पद्धतीनं विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते पाहता नितीश यांच्या मनात बरंच काही सुरू असल्याचं दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.