CM Of Jharkhand: राजकारणाची खाण झारखंडचं राजकारण...23 वर्षात 12 CM, फक्त एका मुख्यमंत्र्याने पूर्ण केला कार्यकाळ

CM Of Jharkhand: खनिज समृद्ध असलेले झारखंड हे जसे खाणींचे राज्य आहे तसेच झारखंड राजकारणाची देखील खाण आहे, असे म्हणतात. झारखंमध्ये मुख्यमंत्री किमान दिड वर्ष राहतात. झारखंडने २३ वर्षाच्या इतिहासात १२ मुख्यमंत्री पाहीले आणि राष्ट्रपती राजवाटीचे तीन कालखंड पाहीले. तसेच मुख्यमंत्री पदावर राहण्याचा देखील एक गौरव आहे.
CM Of Jharkhand
CM Of Jharkhand
Updated on

CM Of Jharkhand:  

'टायगर ऑफ झारखंड' म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंपई सोरेन यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिबू सोरेन यांचे आशीर्वाद घेऊन ते राजभवनात पोहोचले आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल (गुरुवार) संध्याकाळी चंपई सोरेन यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. अनेक आमदारांसह त्यांनी जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. यानंतर झारखंडचे राज्यपाल सीपी राधा कृष्णन यांनी चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदासाठी शपथ दिली.  

आज सुप्रीम कोर्टाने हेमंत सोरेन प्रकरणावर सुनावणी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना आधी उच्च न्यायालयात जायला हवे होते, असे सांगितले. याशिवाय सर्वांच्या नजरा आज झारखंडमधील पीएमएलए कोर्टावरही असतील. हेमंत सोरेन यांच्या कोठडीबाबत पीएमएलए न्यायालय आजच निकाल देणार आहे. एका ईडी कारवाईने झारखंडच्या राजकारणात खळबळ माजवली. खनिज समृद्ध असलेले झारखंड हे जसे खाणींचे राज्य आहे तसेच झारखंड राजकारणाची देखील खाण आहे, असे म्हणतात. झारखंमध्ये मुख्यमंत्री किमान दिड वर्ष राहतात. झारखंडने २३ वर्षाच्या इतिहासात १२ मुख्यमंत्री पाहीले आणि राष्ट्रपती राजवाटीचे तीन कालखंड पाहीले. तसेच मुख्यमंत्री पदावर राहण्याचा देखील एक गौरव आहे.

शिबू सोरेन यांना बिहारमधून वेगळे झारखंड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नेते मानले जाते. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात ते केवळ १० दिवस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले होते. 'गुरुजी' म्हणून ओळखले जाणारे शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ची स्थापना केली. शिबू सोरेन हे हेमंत सोरेन यांचे वडील आहेत. हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्यात अटक केली आहे. (Jharkhand News in Marathi)

१५ नोव्हेंबर २०२२ ला झारंखडला राज्याचा दर्जा मिळाला. तेव्हापासू सोरेन परिवार आणि झारखंड असं एक नात आहे. तेव्हापासून सोरेन परिवार राजकारणाच एक भाग आहे. शिबू सोरेन हे झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मधु कोडा हे मुख्यमंत्री होते.  झारंखडला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी राज्याची कमान सांभाळली. ते सुमारे दोन वर्षे आणि तीन महिने सत्तेत राहिले. बाबुलाल मरांडी यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. सर्व आदिवासी नेत्यांना सत्तेत सहभाग हवा होता. यानंतर बाबूलाल मरांडी हे राज्याच्या आदिवासी-गैर-आदिवासी राजकारणाचे बळी ठरले.

राज्याने १२ मुख्यंमंत्री पाहीले. यामध्ये हेमंत सोरने यांचे वडील यांनी सर्वात कमी दिवस म्हणजे फक्त १० दिवस मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली. तर भाजपचे रघुवर दास हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. सोरेन कुटुंबाने ५ वेळा मुख्यमंत्री पद भुषविले. शिबू सोरेन तिने वेळा मुख्यमंत्री होते पण त्यांचा कार्यकाळ कमी होता.

CM Of Jharkhand
Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या तळघरात पुजेच्या स्थगितीला हायकोर्टाचा नकार; मशीद समितीची याचिका फेटाळली

झारखंड आंदोलनात प्रभावीपणे सक्रीय असलेले शिबू सोरेन तीन वेळा मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्या पक्षाला झारखंड विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही. या कालावधीत झारखंडची राजकीय अस्थिरता देखील दिसून आली, परिणामी तीनदा राष्ट्रपती राजवट लागू झाली. २०१९ च्या झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या JMM-नेतृत्वाखालील आघाडीने सरकार स्थापन करून बदल घडवला. JMM ला काँग्रेस आणि तीन लहान पक्षांचा पाठिंबा होता. (Latest Marathi News)

2000 पासून, JMM चे शिबू सोरेन आणि त्यांचा मुलगा हेमंत सोरेन वगळता झारखंडचे सर्व मुख्यमंत्री विविध पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित आहेत.  JMM ने भाजपच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु झारखंडला एक-पक्षीय शासन देण्यासाठी २०१९ मध्ये आवश्यक जागा जिंकता आल्या नाहीत. JMM-नेतृत्वाखालील युती आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची बहुधा शक्यता असली तरी, हेमंत सोरेन मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ यादीत सामील झाले आहेत जे त्यांचे पूर्ण पाच वर्षांचे कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.

CM Of Jharkhand
Baba Siddique : सलमान शाहरुखची भांडणे सोडवणारा नेता का आहे काँग्रेसवर नाराज? स्वतःच दिलं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.