25 आमदार राजीनामा देणार अन् लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सरकार कोसळणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सत्ताधारी पक्षाचे सुमारे २५ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत - बसनगौडा पाटील-यत्नाळ
Siddaramaiah leadership Congress government in Karnataka
Siddaramaiah leadership Congress government in Karnatakaesakal
Updated on
Summary

'काही मंत्री सर्वाधिकार मिळाल्यासारखे वागत आहेत आणि अधिकाऱ्यांची हकालपट्टी किंवा बदल्या करत आहेत.'

बंगळूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार (Congress Government) पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) कोसळेल, कारण सत्ताधारी पक्षाचे सुमारे २५ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सोमवारी केले.

Siddaramaiah leadership Congress government in Karnataka
NCP Crisis : राजकारणात बेरीज करायची असते, भागाकार-वजाबाकी होऊ नये म्हणून..; 'साहेब-दादा' भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील?

बसनगौडा (Basangouda Patil-Yatnal) म्हणाले, “१३५ जागा मिळाल्या म्हणणाऱ्या काँग्रेसला झोप येत नाही. ३० आमदार बाहेर गेले तर सरकार पडेल. २५ आमदार तयार आहेत. काही मंत्री सर्वाधिकार मिळाल्यासारखे वागत आहेत आणि अधिकाऱ्यांची हकालपट्टी किंवा बदल्या करत आहेत.

Siddaramaiah leadership Congress government in Karnataka
PN Patil : शरद पवारांना अडचणीत आणणाऱ्या महाडिकांना तेंव्हाच धोक्याची घंटा दिली होती; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

बसवराज रायरेड्डी यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस आमदारांनी कर्नाटक हे 'भ्रष्ट राज्य' बनल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नुकत्याच झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत व्यक्त केलेल्या नाराजीकडे लक्ष वेधून यत्नाळ म्हणाले की, त्यांचे स्वतःचे आमदार असे बोलत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()