PM मोदी आणि CM ठाकरे यांच्यात 10 मुद्यांवर चर्चा

PM मोदी आणि CM ठाकरे यांच्यात 10 मुद्यांवर चर्चा
Updated on
Summary

आम्ही जे प्रश्न जे मांडले ते सोडवतील अशी अपेक्षा असून मोदी ते करतील असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील विविध प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळपास पाऊण तास चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आलो होतो. भेट अधिकृत होती. राज्यातील काही प्रमुख प्रश्न मांडण्यासाठी ही भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यातील बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. मोदींनी आमच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आहेत. आता आम्ही जे प्रश्न जे मांडले ते सोडवतील अशी अपेक्षा असून मोदी ते करतील असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

PM मोदी आणि CM ठाकरे यांच्यात 10 मुद्यांवर चर्चा
PM मोदींनी गांभिर्याने ऐकून घेतलं, आम्ही समाधानी- मुख्यमंत्री

कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

1 - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यासंदर्भार पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली.

2 - इतर मागासवर्गीयांचे पंचायत राजमध्ये राजकीय आरक्षण हा देशाचा विषय

3 - पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली

4 - महाराष्ट्राला 24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा मिळावा

5 - शेतकऱ्यांचा एक प्रश्न, पीक कर्जाप्रमाणे पीक विम्यासाठी ज्या अटी आहेत त्यात बदल करावा. राज्यात पीक विम्यासाठी असलेलं बीड मॉडेल राबवावं.

6 - कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता यावर चर्चा

7 - चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा तडाखा बसला. यात मोठं नुकसान झालं. मदतीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष आहेत त्यात बदलाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारपेक्षा जास्त मदत केली. जुन्या नियमांनुसार मिळणारी मदत अपुरी ठरते.

8 - 14 व्या वित्त आयोगाची थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रॅंट मिळण्याबाबत चर्चा, 1 हजार 444 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मिळावा

9 - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी

10 - राज्यपाल नियुक्त बारा जागा, रितसर ठराव केला आहे. राज्यपालांची भेट घेतली आहे. या 12 जागा लवकरात लवकर नियुक्ती व्हावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.