CM Yogi: देवरिया हत्याकांड प्रकरणी योगी सरकारचा दणका, निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश

9 वर्षे तक्रारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निवृत्तीनंतर कारवाई, सीएम योगींची कठोर कारवाई
CM Yogi
CM YogiEsakal
Updated on

ऑक्टोबर महिन्यात देवरियातील फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून झालेल्या ६ जणांच्या हत्येमुळे संपूर्ण उत्तरप्रदेश हादरले होते. या प्रकरणी, आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशांतर्गत देवरिया पोलीस ठाण्याच्या पोलीस व तहसीलच्या १५ अधिकाऱ्यांना कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

देवरियातील रुद्रपूर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या फतेपूर क्षेत्रात जमीनवादातून २ ऑक्टोबर रोजी माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचचंद्र यादव यांची दिवसाढवळ्या हत्त्या करण्यात आली होती. त्यानंतर सूडाच्या भावनेत प्रेमचंद्र यांच्या कुटंबीयांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांची हत्त्या केली. यात सत्यप्रकाश दुबे समावेत त्यांच्या कुटूंबातील ४ जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एकाच गावात झालेल्या या ६ जणांच्या हत्येमुळे उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर शंका उपस्थित झाली होती. (Marathi Tajya Batmya)

CM Yogi
RBI MPC Meeting: अच्छे दिन कधी येणार? महागाईबाबत RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले...

वादाची सुरवात २०१४मध्ये झाली, जेव्हा प्रेमचंद्र दुबे यांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या भावाचे अपहरण करून स्वतःच्या नावावर त्यांची जमीन करून घेतील होती, त्यांनंतर न्यायासाठी सत्यप्रकाश दुबे यांनी कोर्टात हे प्रकरण नेले होते. तरीही योग्य तो निर्णय न आल्याने सत्यप्रकाश यांनी पोलीस, तहसील व लेखपालांकडे अनेक दौरे केले. परंतु प्रशासनाने वर्षानुवर्षे प्रकरण लांबणीवर टाकले व प्रेमचंद्र यांची बाजू घेतली. ज्यामुळे २ ऑक्टोबर रोजी एवढी मोठी घटना घडल्याचा आरोप सत्यप्रकाश दुबे यांच्या, अशी निराशापूर्ण तक्रार कन्या शोभिता व्यक्त केली आहे.

CM Yogi
Assembly Election: 5 राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार; ब्ल्यू प्रिंट तयार, काय असेल टाईमटेबल?

योगींच्या कारवाईत सेवानिवृत्त पोलिसांना अटक!

घटनेवरील शासकीय अहवालात देवरीया पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. योगींच्या या कारवाईत १५ पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात निवृत्त व बदली झालेल्या पोलसांना समावेश आहे.

सत्यप्रकाश दुबे यांनी योगींच्या मुख्यमंत्री पोर्टलवर हजारवेळा तक्रार नोंदवली होती. त्यांनी पोलीस ठाण्यात व महसूल विभागाकडे सत्यप्रकाश यांनी त्यांच्या जमिनीवरील प्रेमचंद्र यांच्या बेकायदेशीर मालकीची दोन्ही ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार केली होती. परंतु त्यांना कायम निराशेलाच सामोरे जावे लागले.

CM Yogi
Goregaon Fire: गोरेगाव जळीतकांडातील मृतांसाठी 2 लाख, जखमींना 50,000 नुकसान भरपाई; PM मोदींची घोषणा

योगींच्या या कारवाईनंतर आता सत्यप्रकाश दुबे यांचे पुत्र देवेश दुबे यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली. ते म्हणाले, '...माझा परिवार गेला...त्यांना बकऱ्यासारखा कापलं...यांच्या(अधिकारांच्या) निलंबनाने काय माझे आई-वडील परत थोडी येतील.' (Marathi Tajya Batmya)

योगींच्या कारवाईत सेवानिवृत्त पोलिसांना अटक!

घटनेवरील शासकीय अहवालात देवरीया पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. योगींच्या या कारवाईत १५ पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात निवृत्त व बदली झालेल्या पोलसांना समावेश आहे. यापुढे योगींनी जमीन विवादावरील अगदी छोट्यात छोट्या तक्रारीला देखील दुर्लक्षित न करता वादाच्या मुळाशी जाऊन प्रकरण सोडवावे, असे खडे बोल संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.