CM Yogi: खासदारांनी मोमोजवाल्याला पैसे दिले की नाही? मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न, भोजपुरी सुपरस्टारने दिले उत्तर

गोरखपूरमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मिश्कील अंदाज पहायला मिळाला.
CM Yogi
CM YogiEsakal
Updated on

गोरखपूरमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मिश्कील अंदाज पहायला मिळाला. एका दुकानदाराशी बोलताना त्यांनी खासदार रवी किशन यांचा यावेळी समाचार घेतला. योगींनी दुकानदाराला विचारले की, रवी किशन यांनी मोमोज खाल्ल्यानंतर पैसे दिले की नाही. यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उपस्थित सर्व नेते यांच्यामध्ये एकच हशा पिकला. (Marathi Tajya Batmya)

यानंतर रवि किशन स्वतः उभे राहिले आणि स्पष्टीकरण देऊ लागले. त्यांनी दुकानदाराला प्रश्न केला की, मी पैसे दिले की नाही ते सांगण्यास सांगितले. यावर दुकानदार म्हणाला- हो, त्यांनी पैसे दिले होते.

जेपी नड्डा गेल्या बुधवारी गोरखपूर दौऱ्यावर होते. जिथे सीएम योगी, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि इतर मोठ्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. दरम्यान, त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका दुकानदाराला हसून विचारले की त्यांच्यापैकी कोणी (भाजप नेते) त्यांच्या दुकानात आले होते का? त्यावर दुकानदार म्हणाला- होय, खासदार (रवि किशन) आले होते.

ज्यावर सीएम योगींनी विचारले त्यांनी काय खाल्ले? तर दुकानदार म्हणाला- मोमोज. हे ऐकून मुख्यमंत्र्यांनी गंमतीने विचारले की, पैसे वगैरे दिले आहेत की नाही. हे ऐकून नड्डा, भूपेंद्र चौधरी यांच्यासह उपस्थित सर्व नेते हसू लागले.

CM Yogi
Indira Bhavan: काँग्रेसचं मुख्यालय नव्या इमारतीत होणार शिफ्ट; जाणून घ्या 'इंदिरा भवन'ची खासियत

रवी किशन सीएम योगींच्या मागे बसले होते. हे संभाषण ऐकून ते ताबडतोब उभे राहिले आणि त्याने दुकानदाराला विचारले की, मी पैसे दिले आहेत की नाही? ते सांगा त्यावर दुकानदाराने 'हो' असे उत्तर दिले. या संपूर्ण घटनेदरम्यान सर्वजण हसत होते.(Latest Marathi News)

दरम्यान, जेपी नड्डा यांच्या या भेटीला आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडले जात आहे. यूपीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी 'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रम सुरू केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विजयाचा मंत्र दिला. तसेच तीन राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचे वातावरण 2024 पर्यंत कायम ठेवावे, असेही सांगितले.

CM Yogi
तमिळनाडूच्या मंत्र्याला हाय कोर्टाने सुनावला 3 वर्षांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा, खासदार रवी किशन यांच्यासह अनेक बडे नेते भाजपच्या संकल्प यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले की, डबल इंजिन सरकारमध्ये नवीन गोरखपूर नवीन आकार घेत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांना योजनांचा लाभ मिळत आहे. यापूर्वी त्यांनी बस्ती जिल्ह्यातील संसद क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले होते.

CM Yogi
Sharad Pawar : जगदीप धनकड यांच्या मिमिक्री प्रकरणावर शरद पवारांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.