धार्मिक यात्रांमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नको; CM योगींच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवान शिवाचे भक्त कावड यात्रा आयोजित करतात.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवान शिवाचे भक्त कावड यात्रा आयोजित करतात.

Kawad Yatra 2022 : पवित्र अशा श्रावण (Shravan) महिन्यात भगवान शिवाचे भक्त कावड यात्रा (Kawad Yatra) आयोजित करतात. ज्यामध्ये शेकडो भाविक भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी हरिद्वार आणि गंगोत्री धाम इथं पायी प्रवास करतात. हरिद्वार आणि गंगोत्री सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचं भरलेलं पाणी भगवान शिवाला अर्पण केलं जातं. ज्यांना ही यात्रा पायी करणं शक्य नाही ते भाविक वाहनानं प्रवास करतात.

याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पोलीस (Police) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. योगींनी कावड यात्रा मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रं बनवण्याचे निर्देश दिलेत. तसेच तीर्थयात्रेत शस्त्रांचं प्रदर्शन करू नये, असं आवाहनही त्यांनी केलंय.

Yogi Adityanath
धक्कादायक! फोटोसाठी शिक्षकांनी दोन दलित विद्यार्थिनींना काढायला लावला गणवेश

राज्य सरकारच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांनी काल (सोमवार) जिल्ह्यात तैनात असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conference) संवाद साधला. यावेळी त्यांनी यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडावी, अशा सूचना केल्या आहेत.'

Yogi Adityanath
कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा..; भाजपच्या खासदाराला धमकीचं पत्र

योगी पुढं म्हणाले, यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर कावड यात्रेचं आयोजन केलं जात आहे. अशा परिस्थितीत भाविकांमध्ये उत्साह असणं स्वाभाविक आहे, त्यामुळं आपण अधिक सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कावड यात्रा मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य केंद्रं उभारली पाहिजेत. गाझियाबाद-हरिद्वार हा मार्ग कावड यात्रेच्या दृष्टिकोनातून सर्वात वर्दळीचा असून इतर राज्यांतूनही भाविक इथं येतात, त्यामुळं सीमावर्ती राज्यांशीही संपर्क ठेवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.