Video: रस्त्यावरील महिलेच्या आजारी मुलाला पाहून CM जगन मोहन यांनी थांबवला ताफा

ys jagan mohan reddy
ys jagan mohan reddy
Updated on

अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी गुरुवारी एक महिला आणि तिच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी त्यांचा ताफा थोडा वेळ थांबवला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलेला मदत केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (cm ys jagan mohan reddy news in marathi)

ys jagan mohan reddy
भारतीय नौदलासाठी पुण्यात बनवलं खास प्रवासी ड्रोन; पायलटशिवाय करता येणार प्रवास

मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी काकीनाडा जिल्ह्यातील तुनी येथे दिलेल्या भेटीदरम्यान, गर्दीत एक महिला आपल्या मुलाला धरून बसलेली दिसली. ही महिला आपल्या मुलाच्या आजारपणासाठी मदत मागत होती. हे पाहून रेड्डी यांनी आपला ताफा काही वेळ थांबवला आणि महिलेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री रेड्डी महिलेला धीर देताना दिसून आले.

प्रतिपाडू मतदारसंघातील संखावरम मंडळातील मंडपम गावातील तनुजा या महिलेने मदत मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलाच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिथे उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना महिला आणि तिच्या मुलाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.