नवी दिल्लीः सर्वसामान्य जनता महागाईच्या झळा सोसत असतांना सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. सीएनजी आठ रुपये तर पीएनजी ५ रुपयांनी स्वस्त झालेलं आहे.
मध्यरात्रीपासून लागू होणाऱ्या या निर्णयानंतर सीएनजी 79 रुपये प्रति किलो आणि पीएनजी 49 रुपये प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. 1 एप्रिलपासून एपीएम गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असेल.
महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी, MGL ने मुंबईत CNG च्या किमती प्रति किलो 8 रुपये आणि PNG च्या किमती 5 रुपये/SCM ने कमी केल्या आहेत.
स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूसाठी नवीन किंमत प्रणाली जाहीर केल्यानंतर एमजीएलने हे पाऊल उचलले आहे. या घोषणेनंतर सरकारने शुक्रवारी सीएनजी आणि गॅसच्या नवीन दरांची घोषणा केली. एमजीएलने फेब्रुवारीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात केली होती. असे असूनही, सीएनजीच्या किमती एप्रिल 2022 च्या तुलनेत जवळपास 80 टक्क्यांनी जास्त आहेत.
एमजीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, सीएनजी-पीएनजी ग्राहकांना देशांतर्गत उत्पादित गॅसच्या किमतीतील कपातीचा लाभ देताना आनंद होत आहे.
या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 8 रुपये आणि पीएनजीच्या दरात 5 रुपये प्रति घनमीटरने कपात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.