नवी दिल्ली - ‘सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केले आहे. आमचे लग्न शेतकऱ्याशी आणि शेतीशी झाले आहे. आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील. त्यासाठी पुढच्या दोन वर्षांत कार्यक्षमता वाढवून उलाढाल २५ टक्क्यांनी वाढविण्याचे लक्ष्य ठेवावे,’’ असे व्यावहारिक बोल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी सुनावले.