कोळसा संपला तर निम्मा भारत अंधारात? जाणून घ्या जगात साठा किती

coal
coal coal
Updated on

नागपूर : मागील काही दिवसांपासून कोळशाची मोठी कमतरता भासत आहे. चार दिवस पुरेल, पाच दिवसच पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. कोळसा संपला तर नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो. चोवीस तास फॅन, एसी व कुलरच्या हवेत राहणाऱ्या नागरिकांना विजेअभावी अंधारात राहायचे काम पडले तर? होय... जर कोळसा संपला तर भारतातील दहापैकी पाच ते सहा घरांमध्ये अंधाराचे साम्राज्य येईल.

देशातील १३७ कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांपैकी ७२ मध्ये ती दिवस, ५० कारखान्यांमध्ये चार दिवस आणि ३० मध्ये फक्त एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. सामान्य दिवसांमध्ये १७ दिवस पुरेल इतका कोळसा राखीव असतो. जगात ३७ टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते, उर्वरित ६७ टक्के इतर मार्गाने तयार होते. यातील ५५ टक्के वीज एकट्या भारतात बनते. जगातला कोळसा संपला तर दहापैकी तीन ते चार घरात अंधार होईल तसेच भारतातील पाच ते सहा घरांमध्ये.

coal
जनावरे चराईसाठी गेलेल्या गुराख्याला वाघ दिसला मोर खाताना; मग...

सद्या जगात दरवर्षी सरासरी १६,००० दशलक्ष टन कोळसा उत्पादित केला जातो. २०१९ मध्ये १६ हजार ७३१ दशलक्ष टन कोळसा तर २०२० मध्ये १५ हजार ७६७ दशलक्ष टन कोळसा तयार करण्यात आला. यापैकी जवळपास ६० ते ६५ टक्के कोळसा फक्त वीज निर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा उत्पादक देश आहे. भारतात वर्षाला सरासरी ७६० दशलक्ष टन कोळसा उत्पादित होते. यातील जवळपास ७५ टक्के कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जातो. मागच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ७२ टक्के कोळसा वीजनिर्मितीवर खर्च झाला, हे विशेष...

भारताकडे ३१९ अब्ज टन कोळसा

जगभरात वर्ष २०१६ मध्ये कोळसा मोजला गेला होता. त्यावेळी १,१४४ अब्ज टन कोळसा शिल्लक होता. जगात दरवर्षी सुमारे ८.५ अब्ज टन कोळसा वापरला जातो. या वेगाने पुढील १३४ ते १३५ वर्षांत कोळसा संपुष्टात येईल. भारताचा विचार केल्यास ३१९ अब्ज टन कोळसा शिल्लक आहे. भारतात सरासरी एक अब्ज टन कोळसा वापरला जातो. आंतरराष्ट्रीय एजन्सीवर विश्वास केला तर आपल्याकडे १०७ वर्ष टिकेल इतका कोळसा शिल्लक आहे.

coal
‘ते सरकार पाडून दाखवा म्हणतात ना’ सध्या त्यात इंटरेस्ट नाही

२५ टक्के नूतनीकरणक्षम संसाधने वीजनिर्मिती करण्यास सक्षम

भारतात केवळ २५ टक्के वीज नूतनीकरणक्षम संसाधनांद्वारे तयार केली जाते. तर १२ टक्के जलविद्युत प्रकल्पांद्वारे तयार होते. बहुतेक कोळसा सुमारे ५५ टक्के वीज निर्माण करतो. देशात २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जेसाठी १,७५,००० मेगावॉटचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे एकूण ३,८४,११५ मेगावॉट वीज निर्मितीच्या ४५ टक्के आहे. हे साध्य करणे सद्या कठीण आहे. २०२० च्या अहवालानुसार केवळ २५ टक्के नूतनीकरणक्षम संसाधने वीजनिर्मिती करण्यास सक्षम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.