Rajasthan Election: गेहलोत-पायलट यांच्यात शीतयुद्ध सुरूच! उमेदवारीवरून अद्यापही अनेकांना परस्परांचा विरोध कायम

गेहलोत-पायलट यांच्यात समेट झाल्याचे वरवर दिसत असले तरी त्यांच्यातील मतभेद कायम असल्याचे दिसून येत आहे.
Rajasthan Election
Rajasthan ElectionEsakal
Updated on

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये समेट झाल्याचे वरवर दिसत असले तरी त्यांच्यातील मतभेद कायम असल्याचे विधानसभेच्या उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यास होत असलेल्या विलंबावरून स्पष्ट झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. मात्र पुरेसे संख्याबळ न लाभल्याने हे बंड अयशस्वी ठरले. या नंतर गेहलोत यांनी आमदारांवरील पकड पुन्हा पक्की केली. परंतु त्यामुळे काँग्रेसमध्ये गेहलोत यांचे निष्ठावंत आणि पायलट यांचे निष्ठावंत असे गट पडले. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांनी आमच्यामध्ये मतभेद नसून राजस्थानच्या विकासासाठी व राज्यात पुन्हा काँग्रेस पक्षाला सत्ताधारी करण्यासाठी एकत्र असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु उमेदवारांची नावे निश्चित करताना दोन्ही गटांनी आपापल्या उमेदवारांच्या नावांचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.

Rajasthan Election
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातील राजकारणावर होणार 'मंथन' !

काँग्रेसने आतापर्यंत पाच याद्या जाहीर केल्या आहेत. यात १५६ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सहा नोव्हेंबर असताना अद्यापही ४४ उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केलेली नाही. यात मुख्यमंत्री गेहलोत यांच्या अनेक निष्ठावंतांचा समावेश आहे. यात गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शांती धारिवाल, महेश जोशी व धर्मेंद्र राठोर यांच्या उमेदवारीही अद्याप पक्षाने जाहीर केलेल्या नाहीत.

या तिघांची नावे समोर आली तेव्हा पायलट गटाने जोरदार आक्षेप घेतला. पक्षांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना उमेदवारी कशी काय द्यायची, असा सवाल उपस्थित करण्यात आला.यामुळे मुख्यमंत्री गेहलोतसुद्धा फार युक्तिवाद करू शकले नाही. या तिघांच्या नावाला पायलट यांचा विरोधात कायम राहणार असल्याचे समजते.

Rajasthan Election
Raghav Chadha:'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव, 'आप'नेते राघव चड्ढा यांचा आरोप

आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीमध्ये सचिन पायलट यांच्या समर्थकांना उमेदवारी देताना मुख्यमंत्री गेहलोत यांनी काहीशी सौम्यता दाखविली आहे. परंतु अधिकाधिक ठिकाणी आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी, यासाठी दोन्ही नेते कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री गेहलोत गटाचा प्रभाव असला तरी पायलट गटाने काही जागांवर आपले प्रभाव दाखवून निष्ठावानांना उमेदवारी देण्यास यश संपादन केले आहे.

काही विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळू न देण्यात पायलट गटाला यश मिळाले आहे. यामुळे उर्वरित ४४ मतदारसंघाचे उमेदवार ठरविताना हे मतभेद पुन्हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Rajasthan Election
Karnataka Politics : काँग्रेस हायकमांडनं 'हा' विषय घेतला गांभीर्यानं, सुरजेवालांनी थेट आमदार, मंत्र्यांनाच धरलं धारेवर

भाजप विरुद्ध भाजप

किशनगड मतदारसंघातून काँग्रेसने विकास चौधरी यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत लावून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते विकास चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि लगेच त्यांना चौथ्या यादीत उमेदवारीही देण्यात आली. या मतदारसंघातून भाजपने माजी खासदार भगीरथ चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

Rajasthan Election
MP Assembly Election 2023: गड कोण राखणार... ज्योतिरादित्य की दिग्विजय सिंह? भाजप अन् काँग्रेसमध्ये पराकोटीचा संघर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.