Rahul Gandhi: "निर्णय काहीही होऊ द्या..."; सुप्रीम कोर्टाच्या 'सर्वोच्च' दिलाशानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत

सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना सर्वोच्च दिलासा दिला आहे.
Supreme Court to Rahul Gandhi
Supreme Court to Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली : 'मोदी' आडनाव बदनामीच्या खटल्यात सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा दिला आहे. त्यांच्यावरील गुन्ह्याला कोर्टानं स्थगिती दिली आहे. यानंतर काँग्रेसच्या गोटात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Come what may my duty remains the same Protect the idea of India says Rahul Gandhi after relief him by SC)

राहुल गांधींनी केलं ट्विट

राहुल गांधींनी ट्विट केलं की, "सुप्रीम कोर्टाचा निर्णय काहीही आलेला असेल पण, भारताच्या कल्पनेचं संरक्षण करण्याचं माझं काम मी कायम करत राहणार आहे" सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं राहुल गांधींचा लोकसभेत परतण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. (Marathi Tajya Batmya)

Supreme Court to Rahul Gandhi
Gyanvapi Mosque: ASI सर्व्हेचा मार्ग मोकळा; स्थगितीला नकार देत सुप्रीम कोर्टानं दाखवला हिरवा कंदील

मतदारांच्या अधिकारावर परिणाम

राहुल गांधी यांना दिलासा देताना ट्रायल कोर्टाच्या आदेशाचे परिणाम व्यापक असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. गांधींच्या सार्वजनिक जीवनात राहण्याचा केवळ अधिकारच नाही तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांच्या अधिकारावरही परिणाम झाला, अशी टिप्पणीही यावेळी सुप्रीम कोर्टानं केली. (Latest Marathi News)

Supreme Court to Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींची पुन्हा लोकसभेत होणार एन्ट्री; फक्त करावं लागेच एकच काम

सार्वजनिक जीवनात भाषणं करताना सावधगिरी बाळगा

सार्वजनिक जीवनातील व्यक्तीनं सार्वजनिक भाषणं करताना सावधगिरी बाळगणं अपेक्षित आहे, असंही सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलं. तसेच कोर्टानं म्हटलं की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही, त्यामुळं अंतिम निर्णयापर्यंत दोषी ठरवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.