LPG Price 1 April: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलिंडर झाला स्वस्त

LPG Prices Reduced: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही कपात अशावेळी करण्यात आली आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होणार आहे.
LPG Price 1 April
LPG Price 1 AprilEsakal
Updated on

LPG Prices Reduced: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडर कोलकात्यात 32 रुपयांनी तर मुंबईत 31.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आजपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत. एलपीजी सिलिंडर कोलकात्यात 32 रुपयांनी, मुंबईत 31.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LPG Price 1 April
April Fools' Day : एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो 'एप्रिल फुल डे'?

IOC नुसार, दिल्लीत आजपासून 19 किलोचा LPG सिलेंडर 1764.50 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो 1795 रुपये मिळत होता. कोलकाता येथे आता 1911 रुपयांऐवजी 1879.00 रुपयांना मिळेल. मुंबईत 1717.50 रुपये झाला आहे, पूर्वी तो 1749 रुपये होता. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1930.00 रुपयांना मिळणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरवर कपात लागू

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 30.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Price 1 April
Narendra Modi : भ्रष्टाचाऱ्यांना न्यायालयाचे खेटे घालावे लागत आहेत ; पंतप्रधान मोदी

निवडणुकीपूर्वीच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाली कपात

याच महिन्यात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुका या महिन्यात सुरू होणार असून जूनपर्यंत चालणार आहेत. यासोबतच सलग तीन महिन्यांपासून सुरू असलेली व्यावसायिक सिलिंडरची दरवाढही थांबवण्यात आली आहे.

LPG Price 1 April
केजरीवाल, सोरेन यांची तात्काळ सुटका ते भाजपची SIT चौकशी; प्रियंका गांधींनी मांडल्या 'इंडिया'च्या पाच प्रमुख मागण्या

गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दिली होती १०० रुपयांची सूट

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, महिला दिनानिमित्त (८ मार्च २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट जाहीर केली होती, तेव्हा घरगुती LPG सिलिंडर ग्राहकांना मोठी भेट मिळाली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.