इंदूर (मध्य प्रदेश): कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह घरी पाठविण्यासाठी कंपनीने थेट विमान बूक करून मृतदेह घरी पाठवला. मृतदेह घरी पाठविण्यासाठी कंपनीने तब्बल 50 लाख रुपये खर्च केले आहे. लॉकडाऊनच्या काळात विसुविअस इंडिया लिमिटेड या कंपनीने जगभरात आदर्श उदाहरण ठेवले आहे.
विसुविअस इंडिया लिमिटेड ही कंपनी कोलकता असून, रितेश डुंगरवाल हे कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर होते. डुंगरवाल यांचे मुळ गाव इंदूर आहे. डुंगरवाल यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह घरी पाठविण्यासाठी कंपनीने 180 सीटर विमान बुक केले होते. मृतदेह विमानातून घरी पाठविण्यात आला. डुंगरवाल यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 'कोलकत्याहून विमानाची सोय झाली नाही. यामुळे कंपनीने थेट विमानच बुक केले. आम्ही कधी विचारही केला नव्हता, की कंपनी एवढे मोठे पाऊल उचलेल. कंपनीने यासाठी तब्बल 50 ते 60 लाखांचा खर्च करत मृतदेह घरी सोपवला. कंपनीचे दोन अधिकारी सुद्धा तीन दिवस इंदूरमध्ये राहिले. मृत्यूनंतरचे सर्व विधी संपल्यानंतरच ते परतले.'
रितेश यांचे नातेवाईक बादल चौरडिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'रितेश यांचा 19 ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कोलकता येथून इंदूरला आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, कोरोनामुळे मृतदेह घरी आणणे कठीण झाले होते. यावेळी कंपनीने तात्काळ 30 कर्मचारी घरी पाठवले. कुटुंबियांकडून माहिती घेतल्यानंतर मृतदेह इंदूरला पाठवण्यासाठी प्लेनची व्यवस्था केली. कंपनीला मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी 50 ते 60 लाखांचा खर्च आला असेल, कारण रुटीनमध्ये तब्बल 5000 रुपये एका व्यक्तीचे तिकीट असते. त्याशिवाय तीन विविध लोकेशनहून मॉनिटर करीत इंदूरला प्लेन पाठविण्यात आले. त्याशिवाय विमान परत रिकामे परतलं. त्यामुळे कंपनीने खूप मोठा खर्च केला आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने एक आदर्श निर्माण केला आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.