'ट्विटर इंडिया’ने नेमले कायमस्वरूपी अधिकारी; हायकोर्टात माहिती

Twitter
Twitter
Updated on

नवी दिल्ली : ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मने अखेर नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून यान्वये मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी आणि मुख्य नोडल व्यक्तीची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीकडून आज दिल्ली उच्च न्यायालयात याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे न्यायालयाने मात्र ट्विटरने सादर केलेले शपथपत्र हे अद्याप रेकॉर्डवर आलेले नसून ते रेकॉर्डवर आणण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

Twitter
शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले...

न्या. रेखा पल्ली म्हणाल्या, की ‘‘ या शपथपत्राच्या प्रती अन्य पक्षकारांना देण्यात आल्या असून त्यामध्ये केंद्र सरकारच्या वकिलांचा देखील समावेश आहे. केंद्राचे वकील हे याबाबत १० ऑगस्टपर्यंत आपल्या सूचना करू शकतात.’’ यावेळी ट्विटरची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ साजन पुवाय्या म्हणाले, की ‘‘ कंपनीने ४ ऑक्टोबर रोजीच उपरोक्त अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली असून याबाबतचा पूर्तता अहवाल देखील सादर केला आहे.’’ आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने शेवटी तेही नियम पाळत आहेत तर असा टोला कंपनीला लगावला.

Twitter
Sushma Swaraj Death Anniversary : राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व..!

सरकार खातरजमा करणार

केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी आम्ही कंपनीच्या या म्हणण्याची खातरजमा करू इच्छितो असे सांगितले. याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाने या अधिकाऱ्यांची केवळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्याने नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून कंपनी नव्या आयटी नियमांना बगल देत असल्याचेही कोर्टाने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.