Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

मॉन्सून यंदा वेळेवर भारतात दाखल होणार असून त्याचा प्रवास असाच राहिला तर महाराष्ट्रातही तो वेळेवर बरसू शकतो.
Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या
Updated on

नवी दिल्ली : मॉन्सून येत्या २४ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. सध्या मॉन्सूनचा प्रवास हा समाधानकारक असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. जर हा प्रवास असाच कायम राहिला तर महाराष्ट्रातही यंदा वेळेवर पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. (conditions continue to become favorable for Monsoon onset over Kerala during next 24 hours says IMD)

महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार मॉन्सून

केरळबरोबरच येत्या चोवीस तासात मॉन्सून ईशान्येकडील काही भागात देखील सक्रीय होईल. तर मॉन्सूनची वाटचाल अशीच कायम राहिली तर गोव्यात ५ जून रोजी मॉन्सून दाखल होईल आणि ६ जून रोजी तो तळकोकणात अर्थात सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत मध्यमहाराष्ट्र आणि पुढे १५ जूनपर्यंत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या
Jitendra Awhad Apology: जितेंद्र आव्हाडांची जाहीर माफी! म्हणाले, आंबेडकरांचा अपमान...

दरम्यान, मॉन्सूनमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत तो ५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकेल. यंदा पाऊसमान चांगलं राहिल असा अंदाज यापूर्वी हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागात सध्या दुष्काळाची स्थिती असून टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळं जर वेळेवर आणि चांगला पाऊस झाला तर पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.