घरे देण्यासाठी वेगाने हालचाली
भूस्खलनात असंख्य घरांची पडझड झाली असून पीडितांना पुन्हा घर देण्यासाठी केरळ सरकारकडून प्रयत्न केले जात असताना मृतांच्या नातेवाइकांना सहा लाखांची मदत दिली आहे. भूस्खलनामुळे या चारही गावातील सतरा कुटुंबातील एकही व्यक्ती जिवंत राहिलेला नाही. यादरम्यान ११९ जण बेपत्ता आहेत आणि त्यांच्या ९१ नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा केले आहेत. ते नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ३० जुलै रोजी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनात मुंडक्कई आणि चुरलमला येथे चारशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर असंख्य जखमी झाले.
तिरुअनंतपूरम : वायनाडच्या भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या १७९ मृतदेहांची ओळख पटल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. विनाशकारी भूस्खलनात चारही गावातील १७ कुटुंब पूर्णपणे नष्ट झाली असून या कुटुंबातील एकही सदस्य वाचलेला नाही, अशी माहितीही विजयन यांनी दिली. या कुटुंबात एकूण ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. पीडित नागरिकांना घर देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले,