Rajasthan Politics: महाराष्ट्रानंतर राजस्थानातही होणार राजकीय बंड? सचिन पायलट यांचं मोठं विधान

Sachin pilot revoltकॉंग्रेसचे आमदार सचिन पायलट देखील अजित पवारांच्या मार्गावर जाऊन बंड करतील असे भाकित वर्तवले जात होते. मात्र, गुरुवारी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.
sachin pilots and Ashok Gehlot
sachin pilots and Ashok Gehlot Esakal
Updated on

Sachin Pilot Congress meeting: महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षात फूट बघायला मिळाली.

अगदी अशीच परिस्थीती राजस्थानमध्ये देखील होती. कॉंग्रेसचे आमदार सचिन पायलट देखील अजित पवारांच्या मार्गावर जाऊन बंड करतील असे भाकित वर्तवले जात होते. मात्र, गुरुवारी झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

राजधानी दिल्लीमध्ये गुरुवारी (दि. ६ जुलै) कॉंग्रेस पक्षाची मोठी आणि महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राजस्थानमधील एकूण २९ कॉंग्रेस नेते सामील झाले. राजस्थानच्या राजकारणात रस असलेले या बैठकीकडे लक्ष देऊन होते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत.कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेनंतर कॉंग्रेस पक्ष उत्साही आहे.(Latest Marathi News)

कॉंग्रेस आता राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेची पुनरावृत्ती करण्याची तयारी करत आहे. मात्र, पक्षातील हाय कमांडसाठी मोठे आव्हान उभे होते, ते म्हणजे सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील वाद. कॉग्रेसच्या बैठकीनंतर यो दोन बड्या नेत्यांमधील वाद मिटेल, असे मानले जात आहे. या बैठकीनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे वक्तव्य समोर आले आहे. या वक्तव्यावरुन हाय कमांडने पायलट यांची मनधरणी केल्याचे दिसून येते.

sachin pilots and Ashok Gehlot
Lalu Prasad Yadav on PM : बिना बायकोचे पंतप्रधान आवासात राहणे चुकीचे, लालू यादवांचे संदर्भासहित स्पष्टीकरण

सचिन पायलट म्हणाले की, "जवळपास चार तास आमच्यात चर्चा झाली. राजस्थान विधानसभा निवडणूकीची रणनीती बनवण्यात आली. पंचवीस वर्षांपासून राजस्थानमध्ये कॉंग्रेस आणि भाजपची आलटून पालटून सत्ता येण्याचं जे प्रकरण सुरु आहे, ते संपवून कॉंग्रेस पुन्हा सत्तेत कसं येईल या मुद्यावर खुप सार्थक आणि व्यापक चर्चा झाली."(Latest Marathi News)

नाव न घेता गहलोत यांची प्रशंसा

सचिन पायलट पुढे म्हणाले की, "आम्ही सर्व मुद्यांवर खुल्या विचारांनी चर्चा केली. येणाऱ्या महिन्यांमध्ये अजून मेहनत करुन आपली सरकार पुन्हा आणू शकतो असा विश्वास सर्वांनी दर्शवला."

sachin pilots and Ashok Gehlot
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव न घेता त्यांची प्रशंसा करताना पायलट म्हणाले की, "राजस्थानमध्ये ज्या मुद्द्यांवर आपल्या सरकारने काम केलयं, त्याबद्दल आमचे कार्यकर्ते सर्व लोकांना सांगतिल. आमची संघटना, नेते, आमदार, मंत्री सर्वजन मिळून काम करु. आमच्या सर्वांच ध्येय आहे की आम्ही कशा पद्धतीने पुन्हा कॉंग्रेसचे सरकार बनवू."(Latest Marathi News)

पायलट यांची निवडणूकीबाबत भविष्यवाणी

निवडणूकीबाबत भाकित करताना पायलट म्हणाले की, "मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान..२०१८मध्ये या तीन राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला. यावेळी पुन्हा असेच होणार आहे. पूर्ण बहुमताने आम्ही सरकार बनवू आणि याचा प्रभाव २०२४च्या लोकसभेच्या निवडणूकांवरही पडेल."

sachin pilots and Ashok Gehlot
Kolhapur : शरद पवार की हसन मुश्रीफ? राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत कमालीची अस्वस्थता, पक्ष फुटीमुळं मोठा धक्का

सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील नाराजी जगजाहीर आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिब बाण चालवलेले आहे. मागील महिन्यात पायलट गहलोतांना प्रश्न विचारत उपोषणावर बसले होते. नाराज सचिन पायलट यांनी राजस्थान सरकार विरोधात एक यात्रा देखील काढली होती. हाय कमांडने या दोघांमधील वाद सोडवण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर सोपवली होती. मात्र, कमलनाथ यांच्या भेटीनंतरही पायलट नाराज होते.

sachin pilots and Ashok Gehlot
Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.