'कोरोनामुळे स्मृती गेली'; पैशांचा जाब विचारताच मंत्र्याचं ईडीला उत्तर

त्यांच्याकडून २.८२ कोटी रुपये रोख रक्कम आणि १.८ किलो सोनं ईडीने जप्त केलं होतं.
Satendra Jain
Satendra JainSakal
Updated on

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendra Jain) यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे. या ईडी चौकशीमध्ये त्यांनी एक विचित्र कारण सांगितलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात लाटलेल्या पैशाचं काय केलं हे विचारलं असता आपल्याला कोरोना झाल्याने त्यात आपल्याला स्मृतीभ्रंश झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Satendra Jain
'आप'चे मंत्री EDच्या रडारवर; अटकेनंतर सत्येंद्र जैन यांच्यावर कारवाई

मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची चौकशी सुरू आहे. ३० मे रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्याकडून २.८२ कोटी रुपये रोख रक्कम आणि १.८ किलो सोनं जप्त केलं होतं. सत्येंद्र जैन यांची पत्नी, मुलगी आणि मित्रांवरही १६ कोटींहून अधिकचा आर्थिक गैरव्यवहार (Satyendra Jain Money Laundering case) केल्याचा आरोप आहे.

Satendra Jain
मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांची 9 जूनपर्यंत ED कोठडीत रवानगी

ईडी सत्येंद्र जैन यांची चौकशी करत होते. त्यावेळी त्यांना एवढे पैसे कुठून आले, या पैशांचं काय केलं, याबद्दल विचारलं असता जैन यांनी आपल्याला कोरोना झाला होता. त्यावेळी आपली स्मृती गेल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीने कोर्टात ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.