‘जनधन’ची ७ वर्षे! काँग्रेस म्हणतंय, नाव बदलून श्रेय घेण्यात मोदींना प्राविण्य

jairam ramesh
jairam ramesh
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान जन-धन योजनेमुळे (पीएमजेडीवाय) अगणित देशवासियांना आर्थिक नियोजन, सशक्तीकरण व सन्मानपूर्वक जीवन मिळाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या महत्वाकांक्षी योजनेची प्रशंसा केली. जन-धन योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

jairam ramesh
हरयाणा: जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश?

मात्र, यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. ही योजना मोदी सरकारची नसून ती मुळात यूपीए आघाडीचीच आहे. तिचं नाव फक्त भाजप सरकारने बदलून लोकांसमोर आणलं आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, पंतप्रधानांनी जनधन योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे. मात्र, वास्तवात यूपीए आघाडीच्याच मुलभूत बचत योजनेचं नामांतरण केल्याची ही सात वर्षे पूर्ण झाली आहेत. रिनेमिंग, रिपॅकेजिंग आणि रिलाँचिंगमध्ये यांना प्राविण्या प्राप्त आहे.

jairam ramesh
वाढत्या रुग्णसंख्येची चिंता; केंद्राने वाढवली लागू नियमांची मुदत

मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर येताच राबविलेल्या काही ठळक योजनांत २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झालेल्या जन धन योजनेचा क्रमांक वरचा आहे. ज्यांची बॅंकेत खाती नव्हती अशा लाखो गरिबांनी यामुळे बॅंकांमध्ये खाती उघडली. या योजनेमुळे भारताच्या विकासाची गती कायमस्वरूपी बदलली असे सांगून मोदी यांनी म्हटले, की ज्यांनी कधी बॅंकेही पाहिली नव्हती अशा गरीब वर्गाच्या आर्थिक सशक्तीकरणाचे ही योजना भक्कम माध्यम ठरली आहे. या योजनेने वित्तीय लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यात मोठी व मजबूत पारदर्शकताही आणली आहे. या योजनेचे यश हे ती राबविणाऱ्यांचे आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी म्हटले, की योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे भारताच्या अगणित लोकांचे जीवन आणखी सुखकर व चांगले बनविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()